🍭 जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार बदलाचे वारे?
सम्राट टाइम्स न्यूज
लेडी सिंघम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलीस विभागात ऑपरेशन क्लीन आऊट राबविले. कायद्यात कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याना तंबी दिली. समाजातील विकृतीला पायबंद घातला. अवैध धंद्यावर अंकुश बसविला. मात्र काही ठिकाणी अवैध धंदे शिरजोर झाले. मंगरुळपीर अवैध धंद्याचे माहेरघर असून तेथे अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत. रिसोड राजकारण्यांची पंढरी येथेही अवैध धंदे सैराट झाले. कारंजा शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव येथेही अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. मालेगाव तालुक्यात अवैध धंद्यानी कहरच केला आहे. मानोरा तालुका मागासलेला भाग येथे सर्वच प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा आहे. सर्वत्र अवैध धंदे मोठ्या प्रमाणात कित्येक महिन्यापासून सुरू असताना ते बंद करण्याचे धाडस पोलीस विभागा कडून होऊ नये पण जऊळका रेल्वे येथे 2 दिवसापूर्वी लपून छपून चालविणाल्या जाणाऱ्या वरली मटक्यावर चक्क पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला धाड टाकावी लागते यामागील गौडबंगाल काय ? सर्व काही गुलदस्यात आहे. जऊळका येथे पोलीस स्टेशन आहे. जिल्ह्यात एल सी बी विभाग कार्यरत आहे. जऊळका सारख्या गावात 2 दिवसापूर्वी सुरू झालेल्या वरली मटक्यावर धाड प्रकरणात जऊळका ठाणेदाराची बदली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास पोलीस अधीक्षक विशेष पथकाने जिल्ह्याचा फेरफटका मारावा जऊळका ठाणेदाराला लावलेले निकष सत्यात उतरले तर त्या आधारे कित्येक अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याच्या बदलाचे वारे वाहू लागतील हा जर तर चा प्रश्न आहे जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे सुरू आहेत. काही दिवसात सत्य समोर येणारच आहे . जऊळका वरली मटका धाडीत काय दडले आहे हे सुध्दा लवकरच समोर येईल?
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा