गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतुन पहिल्या अपत्यास 5000 रुपयांचा लाभ - वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर पवार



सम्राट टाइम्स न्यूज
 केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत  दि 1 जानेवारी 2017  रोजी किंवा नंतर गरोदर असणाऱ्या किंवा प्रसूत झालेल्या सर्व स्त्रियांना त्यांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी 5000 रुपयाचे अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे   मेडशी प्राथमिक आरोग्य  केंद्रा अंतर्गत येणाऱ्या  सर्व गरोदर प्रसूत महिलांनी  त्यासाठी  पती- पत्नी दोघांचे आधार कार्ड ,महिलांचे लसीकरणाचे कार्ड,   राष्ट्रीयकृत बँकेचे  खाते क्रमांक आदी कागदपत्रांची पूर्तता संबंधित आरोग्य सेविकेकडे करावी. अटींची पूर्तता करणाऱ्या महिला लाभार्थ्याना 5000 रुपये 3 टप्प्यात  30 दिवसाच्या आत अदा करण्यात येणार असल्याची माहिती मेडशी येथील वैदयकीय अधिकारी डॉ किशोर पवार यांनी दिली  .अधिक माहितीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ किशोर पवार यांनी केले आहे . 
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा