रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

अल्पसंख्यांकाच्या उन्नतीकरीता शासनाच्या अनेक योजना कार्यान्वीत


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीकरीता भारत सरकार व महाराष्ट्र शासन प्रयत्नशिल असून त्यासाठी अनेक योजना कार्यान्वीत करण्यात आल्या असल्याचे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमालभाई सिद्दीकी यांनी केले. 18 नोव्हेंबर रोजी बिलालनगर परिसरात भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने मेळावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
    मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मो. इमदादभाई बागवान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमालभाई सिद्दीकी,  भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार विजयराव जाधव, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कलीम रेघीवाले, न.प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, न.प. सभापती राहुल तुपसांडे, न.प. सदस्य अब्दुल चौधरी, मलीक सेठ, भाजपा जिल्हा सरचिटणीस धनंजय रणखांब, अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस वसीम भवानीवाले आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जमाल सिद्दीकी यांनी यावेळी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 138 योजना कार्यान्वीत केल्या असल्याचे सांगुन या योजनेची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रातील मुस्लीम मदरशामध्ये शिकणार्‍या मुलांकरीता शासनाच्या वतीने विशेष योजनेअंतर्गत संपुर्ण पोषण आहार सुरु असल्याचे सांगून अल्पसंख्यांकांना शासनाच्या अनेक योजनांची माहिती नसल्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ घेता आला नसल्याचे सांगीतले. तसेच आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे अल्पसंख्यांकाकरीता येत्या काळात आयटीआय कॉलेज सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. या मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता कासम बेनीवाले, इमाम भवानीवाले, मुन्नाभाई पठाण, सद्दाम मांजरे, नदीम भवानीवाले, कासम चौधरी, जुनेद भवानीवाले, आसीफ हुसेन, नईम बराकपुरा आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार वसीम भवानीवाले यांनी मानले.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा