वाशिम जिल्ह्यातील मेडशी एक गाव शापित झाले असून ग्रामविकास अधिकारी पदाला ग्रहण लागले आहे .दिगजांचा राजकीय करिष्मा कमी झाल्याने काही बांडगुळानी मेडशी गावात हैदोस घातला आहे .गुड मॉर्निंग पथकावर गुन्हे दाखल झाल्याने गावाचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशावर आले. काही विघ्नसंतोषी वृत्तीने गुड मॉर्निंग प्रकरणात तेल ओतण्याचे काम करून नेतेगिरीचा आव आणला .गावविकासात काही नेभळटानी पाचर ठोकण्याचे प्रयत्न चालविल्याने गावाचे नाव बदनाम होत आहे .अधिकाऱ्यांना काही राजकीय खंडणी बहाद्दर तर काही ढाबा शौकीन त्रास देत असल्याने अधिकारी गावात यायला तयार नाहीत .दिग्गजांनी राजकीय सन्यास घेतला की काय असा प्रश्न पुढे आला आहे . काही फितूर वृत्ती गावाला गालबोट लावण्याचे प्रयत्न करीत आहे . काही महिन्याआधी ग्राम पंचायत सदस्यानी पक्षनेत्यांच्या विरोधात बंड पुकारल्याने ग्रामपंचायतीचा रिमोट कंट्रोल हरविल्या आहे तेव्हापासूनच गाव वाऱ्यावर सुटले आहे .13 सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायत ला कित्येक वर्षांपासून ग्रामविकास अधिकारी नसल्याने 13 वित्त आयोगाचा लाखो रुपये निधी पडून आहे तर 14 व्या वित्त आयोगाचा लाखो रुपये निधी ग्रामपंचायत बँक खात्यात येऊन पडला आहे लाखो रुपयाला निधी उपलब्ध असून सुद्धा गाव मूलभूत सुखसुविधे पासून वंचित आहे .पाणी, वीज, रस्ते , शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .गावात घाणीचे साम्राज्य निर्मान झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे .मच्छरांची पैदास वाढण्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे कित्येक महिन्यापासून अमावस्या पौर्णिमेला नळाला पाणी सोडले जात असल्याने पाणी पुरवठा योजने चे तीन तेरा वाजले आहे तिन्ही ऋतुत महिला पुरुष लेकराबाळासह विहिरीवर पाणी भरण्यास एकच गर्दी करतात ग्राम पंचायतच्या कारभारा विरोधात संतापाची लाट पसरली आहे .सद्यस्थितीला गावातील उबळखाबळ रस्त्याला नाल्या नसल्याने सांडपाणी रस्यावरून वाहत आहे. सांडपाण्यावरून भांडणे होणे नित्याचे झाले आहे प्रभाग क्रमांक 5 ला वाळीत टाकला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे गावात एका कमिशनखोर सदस्याने नित्कृस्ट दर्जाचे सिमेंट रस्ते बनविण्याचे काम केले आहे मात्र दलित वस्तीत एकटा दुकता रस्ताच तयार करण्यात आला आहे जिल्हा परिषद सदस्यांने चक्क शासन निधीची वाट लावल्याचे केलेल्या नित्कृस्ट दर्जाच्या कामावरून दिसून येतेे उपसरपंच्या घरासमोर घाणीचे साम्राज्य आहे .त्यांच्या घरासमोर सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने ग्रामपंचायत चे वाभाडे निघाले आहे प्रवाशी निवारा ते तांडा चौक ते नागनाथ शाळा पर्यंत रस्याची दुरावस्था झाली आहे रामू आज्या यांच्या घरापासून ते नागनाथ शाळा रस्ता कित्येक वर्षापासून घाणीच्या गर्तेत अडकला आहे .नाल्या नसल्याने सांडपाणी रस्यावरून वाहत लोकांचा घरात घुसत आहे रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत आहे मीडियाने ग्रामपंचायत ची वृत्त मालिका चालविली ग्रामविकास अधिकाऱ्याचा प्रश्न लावून धरल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी गावाला 3 वेळा ग्रामविकास अधिकारी रुजू होण्याचे आदेश काढले मात्र तिन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आदेशाची पायमल्ली करत रुजू होण्यास नकार दिला अखेर मालेगाव पंचायत समिती मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी मेडशी येथे रुजू होण्यासाठी दोन ग्रामसेवकमध्ये ईश्वर चिट्टी केली .सुडके ग्रामविकास अधिकाऱ्यांने चक्क ईश्वर चिट्ठीला नाकारत मेडशी वादग्रस्त गावात रुजू होण्यास नकार दिला . अखेर सीईओ यांनी गटविकास विकास अधिकाऱ्यांना आदेशा ची पायमल्ली करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांला निलंबित करण्याचे आदेशीत केल्याने ग्रामविकास अधिकारी सुडके रुजू झाले. मेडशी नको म्हणत त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली. तेव्हापासून ग्रामविकास अधिकारी पद रिक्त आहे .त्यामुळे बँकेत पडलेला लाखो रुपये शासन निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे .गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत .गावकऱ्यानी गाव विकासासाठी सदस्यांना निवडून दिले आहे. सदस्यांत समन्वय नसल्याने ग्रामपंचायतचा बाररभागी कारभार सुरू आहे.जनतेनी एकत्रित येत ग्रामपंचायत सदस्या विरोधात एल्गार पुकारन्याची गरज निर्माण झाली आहे तेव्हाच ग्रामपंचायत सदस्य वठणीवर येतील असा जनतेचा सूर आहे गावाचा कारभार पाहणाऱ्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयावर साधे नामफलक नसल्याने केवढे हे दुर्दैव्य !
सम्राट टाइम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा