प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन रिसोड
२५ सप्टेंबर
श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोप येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण समिती अध्यक्ष मा.डॉ. गोपीकिसन सिकची साहेब होते तर सत्कार मुर्ती प्रमुख पाहुणे नवनियुक्त प्राचार्य श्री.डि.एन अघडते सर होते.व्यासपीठावर जेष्ठ प्रा.दिपक अंभोरे,प्रा.जीवन हेम्बाडे व जेष्ठ शिक्षक एस.एस.जाधव सर इ.मान्यवर होते. प्रथम श्री शिवाजी किड्स वाशीमचे अध्यक्ष मा.श्री.स्नेहदिप भैया सरनाईक यांच्या संकल्पनेतुन १४ सप्टेंबर रोजी मा.अँड. श्री किरणराव सरनाईक अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊची नोटबुक तुला करण्यात आली होती.नोटबुकचे वाटप इतर शाळेप्रमाणे श्री.शिवाजी विद्यायल व कनिष्ठ महाविद्यालय मोप येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोपीकिसन सिकची साहेब प्राचार्य श्री.डि.एन.अघडते सर,जेष्ट प्रा.दिपक अंभोरे, प्रा.जीवन हेम्बाडे, जेष्ट शिक्षक श्री.एस.एस.जाधव सर व सर्व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर नवनियुक्त प्राचार्य श्री.डि.एन.अघडते सर यांना प्राचार्य पदाचे नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार अध्यक्ष डॉ. गोपीकिसन सिकची साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पर्यवेक्षक श्री.एस.एस.नरवाडे सर, सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी प्राचार्य श्री.डि.एन.अघडते सर यांचा सत्कार केला.त्यानंतर ज्ञानसागर विद्यामंदिर येथे अध्यक्ष डॉ. गोपिकिसन सिकची,प्राचार्य डि.एन.अघडते सर,पर्यवेक्षक श्री.एस.एस.नरवाडे सर व विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका बोबडे मँडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबूकचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुंत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री.निलेश पुंड सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.
महेंद्र महाजन रिसोड
9960292121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा