महादेव हरणे
मालेगाव येथे गोपाल पाटील राऊत यांच्या जनसंपर्क कायार्लयात जगविख्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मा.ना.मधुकरराव कांबळे ( राज्यमंत्री दर्जा ) यांनी सदिच्छा भेट दिली. स्मारक समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत व सत्कार भा.ज.पा.प्रदेश सदस्य मा.गोपाल पाटील राऊत , युवा मोर्चा जि. सरचिटणीस नितीनभाऊ काळे व युवा मोर्चा शहर अध्यक्ष तेजस आरु यांनी केला.या वेळी बोलताना मा.मधुकर कांबळे यांनी सांगितले कि स्वात्रंत्र्य मिळाल्यापासून उपेक्षित असलेले अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक राहिले आहे भारतीय जनता पक्षा चे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचे पहिले सरकार आहे ज्यांनी जगविख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या साठी सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षते खाली समितीची स्थापना केली त्या मध्ये माझी उपाध्यक्ष पदी निवड करून त्या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्या बद्दल त्यांनी भा.ज.प.च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व मुखमंत्री मा.देवेन्द्र फडणवीस यांचे आभार मानले. या वेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष वासिम पठाण शहर सरचिटणीस अतुल सोभागे मयूर भोयर यांची उपस्थिति होती
महादेव हरणे
9922224889
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा