माहूर (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या संयुक्त विद्यमाने दि २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित वसुंधरा आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी ढेमसा नृत्यास सलग तिस-या वर्षी प्रथम पारितोषिक प्राप्त करून हॅट्रीक साधण्याची किमया केली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारे पहिले महाविद्यालय म्हणून नांवलौकीक प्राप्त केले आहे.
विजयी संघात मनोज सिडाम, मारोती सिडाम, जीवन कुमरे, आशीर्वाद पेंदोर, संदीप उर्वते, वैशाली कुमरे, निशा आतराम,मिनाक्षी आत्राम, संजू कुमरे, वर्षा कुमरे, इ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विजेता संघ, संघव्यवस्थापक प्रा. विजयपाल वाढवे व सहसंघव्यवस्थापक डॉ.रचना हिप्पलगांवकर यांचे बलीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड, उपाध्यक्ष किशोरजी जगत, सचिव सौ. संध्याताई राठोड, प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र लोणे , प्राध्यापक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा