हुकमत मुलाणी उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र सुरु होत नसल्यामुळे येथील एका शेतकर्याने भिक मागो आंदोलन करण्याचा पवित्रा घेणार आसल्याचे निवेदन दिले आहे
मुरूम ते उपनिबंधक कार्यालय उस्मानाबाद पर्यंत शेतकऱ्यांसाठी भीक मागो आंदोलन.
गेल्या अनेक दिवसांपासून मी आपल्याशी व मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांशी मुरूम उडीद खरेदी बाबत चर्चा करीत आहे. ग्रेडर चे कारण दाखवून अद्याप खरेदी बंद आहे. ग्रेडर प्रशिक्षण साठी कर्मचारी गेले असून 22.09 पासुन खरेदी चालु होईल असे सांगण्यात आले. ग्रेडर नेमणुकीचे आदेश असताना ग्रेडर नेमणुकीला उशीर का झाला? हंगामी ग्रेडर नेमणूक करूनही आवक खरेदी चालु ठेवता आले असते निदान जे माल शासनास मान्य नाही त्याची तर खरेदी चालु राहिले असते. ऐन सणा सुदीत शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ शासकीय नियोजन कृती योग्य पद्धतीने हाताळता येत नसल्यामुळे ही वेळ आज आली आहे. कोणती पिके कोणत्या वेळेत बाजारात येतात आणि किती प्रमाणात अंदाजित सरासरी काडून आदीच नियोजन का केले जात नाही. आता तूर, सोयाबीन येईल त्याचेही अंदाजित सरासरी आवक काडुन नियोजन करा म्हणजे शेतकऱ्यांचे हाल थांबतील अन्यथा परत तीच वेळ आणु नका. सद्या मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीत करोडोनी उडीद येऊन पडले आहे आणि अद्याप खरेदी चालु नाही. शेतकऱ्यांनी सण-सूद साजरी करायला परत कर्ज घ्यायचा का? उडीद खरेदी केंद्र लवकर चालु करा किंवा ग्रेडर तपासणी च्या कामाला वेग द्या निदान जे शासन मान्य माल नाही त्याची तर खरेदी चालु होईल. यावर त्वरित कार्यवाही करा अन्यथा 09.10.2017 पासुन मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपनिबंधक कार्यालय उस्मानाबाद पर्यंत "शेतकऱ्यांसाठी भीक मागो आंदोलन" सुरुवात करण्यात येईल.
उस्मानाबाद प्रतिनीधी
हुकमत मुलाणी
मो-8379832200
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा