रविवार, २८ जानेवारी, २०१८

धनज पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गुटखा विक्रीला उधाण


कारंजा तालुक्यातील धनज पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व गावामध्ये गुटखा विक्रीला मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आल्याचे समोर आले आहे. तरुण पिढीमध्ये या गुटखा खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे असे लक्षात येते. गुटखा सेवनामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये तोंडाच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गुटख्याच्या व्यसनामुळे तरुण पिढी कमकुवत होत चालली आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. या कडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गावागावांमध्ये गुटख्याचा व्यवसाय जोरात चालू आहे. गुटखा पुरविणारे लोक हे सायकल व दुचाकी वाहनांचा वापर करून माल पुरवितात, व माल विकण्याचे काम हे गावातील पानटपरी , किराणा दुकान हे करीत आहेत. हे लोक ठोक गुटख्याचा माल  कुठून घेतात हे अजूनही लक्षात आले नाही व याचा थांगपत्ता सुद्धा लागलेला नाही. सर्व परिसराची पाहणी केल्यानांतर असे लक्षात येते कि, गुटखा विक्रीला मोठ्या प्रमाणात उधाण आलेले आहे. याठिकाणी महिन्याकाठी लाखोंचा गुटखा विकला जातो पण या गोष्टीला कुठेच आळा  बसला नाही. याकडे एफ. डी. ए. चे दुर्लक्ष होत आहे. कारण या गुटखा विक्रीवर कार्यवाही न होता तो खुलेआम विकला जात आहे. व प्रत्यक्ष कार्यवाही पाहता फक्त २-३ % कार्यवाही होत आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी लोकांमध्ये चर्चा आहे.  
विनोद नंदागवळी कामरगाव प्रतिनिधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा