शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

प्रलंबित शिष्यवृत्ती मागणीचे उपोषण पीआरसीच्या आश्वासनाने मागे


वाशिम : जिल्हयातील भटक्या व मागासवर्गीय जातीमधुन उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर युवकांनी सुरु केलेले उपोषण पंचायत राज समिती अध्यक्ष व सदस्यांच्या आश्वासनामुळे 19 जानेवारी रोजी मागे घेतले. याबाबत 18 जानेवारी रोजी वंजारी सेवा संघ व युवकांनी निवेदन दिले होते.
    यावेळी उपोषणादरम्यान पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार पारवे व इतर सदस्यांनी उपोषणस्थळाला भेट देवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेवून कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच समाजकल्याण उपायुक्त श्री मुसळे यांनी उपोषणकत्यार्र्ंना लेखी पत्र देवून लवकरात लवकर कार्यवाहीचे आश्वासन दिले.
    याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की, सन 2016-17 व सन 2017-18 ची वार्षिक शिष्यवृत्ती उच्च शिक्षण घेणार्‍या जिल्हयातील भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्यापही न मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे सदरची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. सदर उपोषणामध्ये वंजारी सेवा संघाचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल गंगावने, निलेश जाधव, विशाल नरवाडे, मनिष जाधव, रामु मुधळकर, विजय आपोतीकर, विजय कुलकर्णी, कौस्तुभ देशमुख, पवन जाधव, परिंदसाई चव्हाण, नितीन जाधव, अक्षय राऊत, पवन राऊत, विशाल नरवाडे, विजय वाघ, आदिनाथ बोंदार्डे, वृषभ मनटकर, मोहन गिराडे, रामेश्वर चव्हाण, पवन धांडे, अंकुश राठोड, उमेश अांधळे, जगदीश चौधरी, शिवाणी चोपडे, मेघा वानखेडे, वैष्णवी चतरे, भाग्यश्री गोरे, दिव्या राठोड, सोनाली गोंडे, दिप्ता मनवर, शुभदा मठपती, मृणाली आमटे, किरण राठोड आदी युवक व युवतींनी सहभाग घेतला. सदर उपोषणाला विविध राजकीय पक्ष व सामाजीक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी भेट देवून आपला पाठींबा दिला.

सम्राट टाइम्स मीडिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा