वाशिम, दि. 02 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित , जिल्हा कार्यालय, वाशिम यांचे मार्फत विविध कर्ज योजने अंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील थकीत वसुलीबाबत सचिव, विममुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, कल्याण विभाग, मुंबई यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला असता 463 लाभार्थ्यांकडे एकुण थकीत रक्कम रुपये 264.82 /- इतकी असल्याने थकीत लाभार्थी , त्यांचे जामीनदार हमीपत्र / पगारपत्र धारकाचे वेतनातुन कपात, गहाणखत (कर्ज बोजा नोंद उतारे) इत्यादीचे आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसुल कायदा 1966 मधील तरतुदीनुसार आर.आर.सी. इत्यादी अंतर्गत कार्यवाही करुन वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याचे कामकाज चालू झालेले आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील थकीत लाभार्थींना आवाहन करण्यात येते की, महामंडळाकडुन 31 मार्च 2018 पर्यंत थकीत व्याज रकमेवर लाभार्थींना 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेवून सर्व संबंधित लाभार्थींना थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ग.ह. शेंडे, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
----
वृत्त क्र. 04
माजी सैनिकांना नोकरीची संधी
वाशिम, दि. 02 : जिल्ह्यातील नोकरीकरीता पात्र असलेल्या सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येतेकी, संपुर्ण भारतात माजी सैनिकांना नोकरीकरीता राखीव असलेल्या पदांचा तपशिल जाहिरात पुर्नवसन महानिर्देशालय दिल्ली यांच्या WWW.dgrindia.com वर वेबसाईट कायमस्वरुपी उपलब्ध असते. तरी नोकरी करीता इच्छुक असलेल्या माजी सैनिकांना WWW.dgrindia.com यासंकेतस्थळावर भेट दयावी व पदास अनूसरुन पात्रतेप्रमाणे आवश्यक कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासी संपर्क साधावा जेणे करुन आपले नाव पाठविण्यास सोपे होईल.तरी इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वाशिम यांनी कळविले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा