गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

मेडशी येथे अश्विनी पोर्णिमे निमित्त वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न




विनोद तायडे वाशिम

वाशिम जिल्ह्यातील  मेडशी येथे कपिलवस्तू बुद्ध विहारात वर्षावासा निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न  झाला . अश्वनि पौर्णिमा या मंगलदिनी  महा भोजनदानाचा लाभ गावकार्यानी घेतला बौद्ध धम्मात पौर्णिमेला  अनन्य साधारण महत्व आहे वर्षावासात 3 महिने येथील बुद्ध विहारात बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यातआले  वर्षावास समारोप  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिप बहुजन महासंघाचे जेष्ठ नेते जे एस शिंदे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला  भारिप बहुजन महासंघ जिल्हा निरीक्षक एस बी खंडारे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख   हरिश्चंद्र पोफळे  , भारतीय बौद्ध महासभाचे चंद्रसुभाष   जाभरुणकर   वाशिम  तालुका अध्यक्ष  जिल्हा राजेश तायडे , मालेगाव तालुका अध्यक्ष दीपक वानखडे ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विनोद तायडे ,भारिप बहुजन महासंघाचे विजय मनवर, बाळू खंडारे, समता सैनिक दलाचे मेजर अश्विनी खिल्लारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सुरवातीला पंचशील ध्वजारोहण जे एस शिंदे यांचे हस्ते करण्यात आले .तथागत गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात आले  बौद्ध बांधवानी याप्रसंगी पंचशील ग्रहण केले. जे एस शिंदे यांनी वर्षावास आणि बौद्ध धम्मा विषयी माहिती विशद केली. कार्यक्रमानंतर गावकार्यानी महा भोजनदानाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता सैनिक दल, भीमगर्जना ग्रुप ने अथक परिश्रम घेतले

विनोद तायडे वाशिम
8888277765

४ टिप्पण्या: