शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

शहरात सोयागोल्ड कंपनीच्या भेसळयुक्त व दुर्गंधीयुक्त खाद्यतेलाची विक्री




भाजपा जिल्हा सरचिटणीस अंजली पाठक यांची तक्रार

सम्राट टाइम्स न्यूज

वाशिम - शहरात सोयागोल्ड कंपनीच्या भेसळयुक्त व दुर्गंधीयुक्त सोयाबीन तेलाची विक्री होत असून यामुळे  सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत असून सदर तेलाची विक्री थांबवून नागरीकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची मागणी भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस सौ. अंजली हेमंत पाठक यांनी 13 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देवून केली आहे.
    निवेदनात पाठक यांनी नमूद केले आहे की, सौ.अंजली पाठक यांनी शहरातील एका किराणा दुकानामधून 11 ऑक्टोंबर रोजी सोयागोल्ड रिफाईंड तेलाचे पाकीट खरेदी करण्यात आले. सदर पाकीट घरी नेवून उघडले असता यामध्ये सोयाबीन तेलाऐवजी घट्ट तेल असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकाने हे तेल कंपनीचे छापील नाव असल्यामुळे खरेदी केले. मात्र सदर तेल घट्ट असून तेलाच्या पाकीटाचा दुगर्र्ंधीयुक्त वास येत होता. या तेलाची शहरातील बाजारपेठेत विक्री सुरु असून सदर तेलाच्या सेवनामुळे नागरीकांच्या आरोग्यास अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    त्यामुळेे बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या सोयागोल्ड या कंपनीच्या सर्व तेलाची विक्री थांबवून या तेलाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करावी. व यात दोषी असलेल्या तेल कंपनी व व्यापार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी सौ. पाठक यांनी केली आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

1 टिप्पणी:

  1. लवकरात लवकर ह्यावर बंदी घालून हे तेल बनविणारे व विक्रेते यांच्यावर केस करावी

    उत्तर द्याहटवा