रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

मालेगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा




सम्राट टाइम्स

मालेगांव शहरातील धम्मस्थान बौद्ध स्तूप व इतर ठिकाणी 61 वा धम्मचक्क पवत्तन दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
 
अशोक विजयादशमीला भिमनगर मधील पंचशील विहारात बौद्धाचार्य दिपक घुगे यांचेहस्ते पंचरंगी धम्मध्वजारोहण करण्यात आले. महीला मंडळाच्या वतीने उपासिका आयुष्यमती ललिता पखाले व आयुष्यमती पार्वताबाई इंगळे यांनी तथागत भगवान बुद्ध यांचे मुर्तीला आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमाला पुष्प व हार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास भिमनगरातील बौद्ध उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती.
         61 व्या धम्मचक्क पवत्तन दिनाचा मुख्यकार्यक्रम धम्मस्थान बौद्ध स्तूप येथे आयोजित करण्यात आला होता.
     मालेगांवच्या प्रथम नगराध्यक्ष उपासिका आयुष्यमती मिनाक्षी बाळासाहेब सावंत यानी आपल्या धम्मपती सोबत महाकारुणीक तथागत भगवान बुद्धाच्या थायलंड वरुन आणलेल्या मुर्तींची पुष्पाने, धूपाने पूजा करून भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उभयतांनी वंदन केल.
  या प्रसंगी स्तूपसाठी मोठे योगदान असलेल्या दायीका ललिता सुधाकर पखाले, आयुष्यमती रंजना भारसागळे, सिरीमती प्रयागबाई गायकवाड, पोलिस पाटील समाधान गुडदे, सुभाष खिल्लारे, आयुष्यमती मनकर्णा सदार मँडम, रमाबाई पखाले व पंचफूलाबाई पखाले आदी मान्यवरांनी मनोभावे पूजन केले.
   बौद्ध स्तूप येथे बौद्धाचार्य दिपक घुगे यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील प्रदान करून पूजाविधी घेतला. उपस्थित आयुष्यमती आशा तायडे, उज्ज्वला आरखराव, रंजना भारसागळे, दिपाली सदार आदींनी बुद्ध व भीम गीते सादर केली. मान्यवरांनी धम्मचक्क पवत्तन दिनाचे महत्वविशद करणारे विचार मांडले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन दायक सुधाकर पखाले यांनी केले.
    तहसील समोर : अभिवादन
    स्थानिक तहसील कार्यालयासमोर नव्याबसस्थानका लगत  असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य तसबिरीला नगर पंचायतचे गट नेते गजानन सारस्कर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
   या वेळी विलास रोकडे, मनोज कांबळे, बाळा सावंत, किशोर मोरे, जितेंद्र डोंगरदिवे, राजू काटे, खंडू पाईकराव, प्रल्हाद कसबे आदीनींही बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन काले. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संदीप सावंत यानी केले. कार्यक्रमास सम्राट मित्रमंडळाचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

सम्राट टाइम्स न्यूज

२ टिप्पण्या:

  1. आयुष्मान विनोद तायडेजी
    सविनय जयभिम
    आपण मालेगांव जि.वाशिम येथील धम्मचक्क पत्तन दिनाचे वृतांकण अतिशय सुंदररितीने काले आहे.
    आपले कार्यकारी संपादक सिरीमान महादेव हरणेजी यांची साथ ही अभिमानास्पदच म्हणावी लागोस. आपल्या संपूर्ण टिमला येणाऱ्या उज्ज्वल काळासाठी मंगलमय मनोकामना.
    आपला
    सुधाकर पखाले
    संस्थापक अध्यक्ष
    मालेगांव तालूका पत्रकार संघ.
    मालेगांव जि. वाशिम.

    उत्तर द्याहटवा