गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

रामगड किल्ला व मातृतीर्थ तलाव दुरुस्तीच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा,



सामाजिक कार्यकर्ता आकाश कांबळे यांची मागणी!

                 माहूर(प्रतिनिधी) – माहूर हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने व भाविक भक्तांमध्ये अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. या तीर्थक्षेत्राच्या श्रद्धेपायी राजकीय नेते माहूर या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असतात. मात्र प्रत्यक्ष कामकाज करणाऱ्या यंत्रणाच्या खाबूगिरीमुळे शासनाच्या करोडो रुपयाच्या निधीमध्ये निधी उपलब्ध करून देणाऱ्याचा उद्दात हेतू सफल होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

               याचे निमित म्हणजे  माहूर तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी माहूर येथील रामगड किल्ला व जगप्रसिद्ध मातृतीर्थ तलावाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाने  उपलब्ध करून दिला असून सदरील किल्ला व मातृतीर्थ तलावाच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून होत असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

     सदरच्या कामात पुरातत्व विभागाचे अधिकारी व ठेकेदार संगनमत करून थातूर मातुर काम करून शासनाच्या निधीची पुरती वाट लावण्याचा प्रयत्न करत असून सदरील कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करून शासनाने ज्या उद्दात हेतूने निधी दिला तो हेतू साध्य करावा असेही म्हटले असून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्याची सुद्धा मागणी केली आहे.

२ टिप्पण्या:

  1. रायगड चा जगप्रसिद्ध किल्ला व मात्रृतिर्थ चे काम खरोखर निकृष्ठ दर्जाचे होत आहे.

    वरिल काचा करिता उच्चस्तरीय नियंत्रण समितीमार्फत मार्फत चौकशी करणे आवश्यक आहे म्हणुनच आपणास विनंती....

    उत्तर द्याहटवा
  2. रायगड चा जगप्रसिद्ध किल्ला व मात्रृतिर्थ चे काम खरोखर निकृष्ठ दर्जाचे होत आहे.

    वरिल काचा करिता उच्चस्तरीय नियंत्रण समितीमार्फत मार्फत चौकशी करणे आवश्यक आहे म्हणुनच आपणास विनंती....

    उत्तर द्याहटवा