बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

बुद्ध विहारांच्या समन्वया साठी माहिती संकलनाची मोहीम


   मालेगांव 
      महाराष्ट्रातील गाव-खेडे-शहर-महानगरांतील लहान मोठ्या सर्व विहारांचा समन्वय असला पाहीजे म्हणून एक समयबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार मार्गक्रमण करण्याचा उपक्रम नागपूरातून सुरू झाला असून त्याचाच एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यातील बुद्ध विहारांची माहीती संकलीत करण्यात येत आहे. 
    सन 2014 ते 2020 या सात वर्षाचे नियोजन करून नागपूरला एक बुद्ध विहार समन्वय समिती अस्थाई स्वरूपात गठन करण्यात आली आहे. त्या समिती मार्फत मे 2015 , एप्रिल 2016 आणि फेब्रुवारी 2017 ला दरवर्षी नागपूरचे *पूज्य भदंत विमलकित्ती गुणसारी* यांच्या मार्गदर्शनात जवळपास 416 विहारांच्या संचालक मंडळ प्रतिनीधीच्या परीषदा घेण्यात
 आल्या आहेत. 
   येणाऱ्या 2018 या वर्षात जवळपास 1000 विहार प्रतिनीधींची परिषद घेण्यांचा या समन्वय समिती चा मानस आहे , आणि पुढे सन 2020 पर्यंत ही संख्या 10000 विहारांच्या समन्वयासाठी जनमत तयार करण्याचे व त्यातून बौद्धांच्या विविध संघटनांची शिखर संघटना ठरावी अशी बुद्ध विहार समन्वय समिती निर्माण करण्याचा मनोदय ठेवून बौद्धांची सुनियोजित अशी एक यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. 
    समिती तर्फे त्यांची माहीती आणि डिसेबंर 2017 ला होत असलेल्या पाली भाषा परीक्षेची माहीती देण्या साठी 22 आक्टोबंरला वाशिमच्या नालंदा नगर बुद्ध विहारात एक दिवसाचे शिबीर संपन्न झाले. त्या मध्ये या प्रकल्पाचे प्रवर्तक व आधार स्तंभ अशोक सरस्वती बोधी व शुद्धोधन बडवने नागपूर यांनी मार्गदर्शन केले. 
      वाशिम जिल्ह्यातील ज्या गावांत बुद्ध विहार अस्तित्वात आहेत. तेथील विहार कमेटीचे दोन क्रियाशील प्रतिनिधी सभासदांची माहीती  एकत्र करण्याची जवाबदारी नालंदा विहार वाशिमचे मिलिंद उके ( मोबाइल -9822323455 ) व धम्मस्थान स्तूप, मालेगांव चे  सुधाकर पखाले ( मो. 9075233272 ) यांचे कडे सोपविण्यात आली आहे. 

       गावांगावांत कार्यरत असणाऱ्या विहार पदाधीकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी सम्पर्क साधून एक मोफत फॉर्म लवकरात लवकर भरून त्यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन सुधाकर पखाले, समाधान गुडदे, सुभाष खिल्लारे व सद्धम्म प्रचार केंद्र यांनी केले आहे.

Samrat times Live 

२ टिप्पण्या: