शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

रिसोड येथे खडसे बंधूनी पत्नीचे पूजन करून दिवाळी केली साजरी



सम्राट टाइम्स लाईव्ह

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे खडसे बंधूनी लक्ष्मीपूजनांच्या दिवशी लक्ष्मी देवतेच्या मूर्तीची पूजा न करता घरात राबराब राबवून  संसार फुलविणाऱ्या अर्धांगिनी ची पूजा करून समाजात आदर्श निर्माण केला .  मातृशक्तीचा, नारीशक्तीचा  सन्मान केला.  रिसोड येथे गोपाल विठोबा  खडसे पाटील ,विनोद विठोबा  खडसे पाटील यांचे  सिद्धिविनायक आटोमोबाईलस चे दुकान आहे .दोघे बंधू संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते आहेत   खडसे बंधूनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दुकानात पूजा अर्चना केली. बळीराजा , राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले  यांच्या प्रतीमेचे विधिवत पूजन केले. खडसे बंधूनी आई द्वारकबाई  खडसे सह सौ रुपाली  गोपाल खडसे आणि सौ अनिता विनोद खडसे  या अर्धांगिनी चे पूजन केले .आरती ओवाळून साडीचोळी भेट दिली. येवती येथील गणेश नाना शिंदे यांनी देखील पत्नीचे पूजन केले .सत्यशोधक समाजाचे सुरकडी येथील पत्रकार गजानन धामणे यांनीही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पत्नी चे पूजन करून साडीचोळी भेट दिली खऱ्या अर्थाने घरातील स्त्री   हीच  धन ,सुख ,समृद्धी ,वैभव आहे. खडसे बंधू गजानन धामणे ,गणेश शिंदे यांनी घरातील लक्ष्मीचे पूजन   करून समाजात नारीशक्तीचा सन्मान वाढविणारा  संदेश दिला.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पत्नीचे पूजन करण्याचा पायंडा भट उमरा येथील केशवराव काळे यांनी 10 वर्षांपूर्वीच पाडला हे विशेष

सम्राट टाइम्स लाईव्ह

५ टिप्पण्या:

  1. समाजासाठी आदर्शवत उपक्रम ।खरे लक्ष्मीपूजन झाले असे म्हणावे लागेल।

    उत्तर द्याहटवा
  2. ए.आर.एम.एस. हिंगणघाट द्वारे लघु चित्रपट तैयार करून ही सुन्दर परिकल्पना आधीच आम्ही सादर केलि आहे. अणि त्याचे पडसाद उमटल्यावर खुप आनंद होत
    ज्याची लिंक खाली दिली आहे. ती पाहून आपले विचार कळवा.

    https://youtu.be/P3i9vr7Eqi0

    उत्तर द्याहटवा
  3. किवा युट्यूब च्या ARMS Hinganghat या चैनल वर जाऊन सुद्धा पाहू शकता

    उत्तर द्याहटवा
  4. khup mast ani chan short film banvali ahe bhau tumhi
    mi khup impress zalo aho.
    ani hich nahi tar mi tumchya pratyek short film baghat asto.
    ARMS HINGANGHAT ki jay ho

    उत्तर द्याहटवा