मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

शेततळे अस्तरीकरण अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन



सम्राट टाईन्स न्यूज

वाशिम :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदकाम केलेल्या किंवा इतर योजनांतर्गत खोदण्यात आलेल्या शेततळ्यांसाठी प्लास्टिक फिल्म अस्तारीकारांसाठी कृषी विभागामार्फत सन २०१७-१८ या वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेततळे या घटकाखाली फिल्म अस्तरीकरणासाठी शेततळ्याच्या प्रत्यक्ष मोजमापानुसार लागणाऱ्या फिल्मच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान स्वरुपात दिले जाणार आहेत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज दि. २३ ऑक्टोंबर २०१७ अखेरwww.hortnet.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने स्वतंत्रपणे सादर करावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी कळविले आहे.

शेततळ्यासाठी वापरायची फिल्म एचडीपीई रिइन्फोर्सडजीओमेंबरेन ५०० मायक्रोन जाडीची IS : १५३५१ :२०१५ Type II दर्जाची असणे आवश्यक आहे. शेततळे अस्तरीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १२० भौतिक व ९० लक्ष रुपये आर्थिक लक्षांक आहे. त्यानुसार सर्व तालुक्यांना २० भौतिक व १५ लक्ष रुपये आर्थिक लक्षांक देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत. तालुक्यांना देण्यात आलेल्या लक्षांकापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यास दि. २५ ऑक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

1 टिप्पणी:

  1. शेतकऱयांना अधिक माहिती वा शंकांचे निरसन होणेसाठी
    सदर विभागाच्या अधिकारी यांचे सम्पर्क क्रमांक मिळाले तर बरे होईल।
    योजना चागली आहे।याचा लाभ जास्तीसजास्त लोकांना व्हावा ही अपेक्षा।

    उत्तर द्याहटवा