सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रश्न प्रलंबित

मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रश्न प्रलंबित

विनोद तायडे
वाशिम
मेडशी येथे  गुन्हेगारीचा आढावा घेत पोलीस महासंचालकांनी मेडशी पोलीस  स्टेशन निर्मितीच्या हालचाली सुरू केल्या मात्र गत 2  वर्षा पासून  पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रश्न प्रलंबित आहे .मागील काही गुन्हेगारीच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला .मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर  वेगाने सुरू झाल्या .काही वर्षाआधी राजकीय  दोन गटात झालेल्या दंगलीने पोलिसांची दमछाक झाली . पोलीस महासंचालकाने गुन्हेगारीचा अहवाल मागविला. .वरिष्ट पातळीवर खलबत होऊन मेडशी पोलीस चौकीचे रूपांतर  पोलीस स्टेशन मध्ये करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.पोलीस स्टेशन निर्मितीला वेग आला . पोलीस महासंचालकाने तत्कालीन पोलीस अधिक्षकाना अहवाल सादर करण्याचे  आदेश दिले . मागील वर्षी पोलीस चौकी जागेची मोजणी झाली. अधिकाऱ्यानी भेटी दिल्यात. मात्र अद्याप पर्यंत मेडशी पोलीस स्टेशनची निर्मिती न झाल्याने प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे .
मेडशी परिसर आदिवासी बहुल आहे .पोलीस चौकी अंतर्गत  मेडशी, रिधोरा, गोकसांगवी,कोलदरा , काळाकामठा,  उमरवाडी, वाकडवाडी, भामटवाडी, भौरद, भिलदुर्ग, वारंगी, पिंपळदरा आदी 12 गावाचा समावेश आहे  त्यापैकी वाकडवाडी,  भामटवाडी, कोलदरा ,काळाकामठा भौरद, भिलदुर्ग, उमरवाडी आदी आदिवासी बहुल गावे  आहेत .परिसरात गुन्हेगारी फोफावली आहे .25 हजार लोकसंख्याची जबाबदारी केवळ 4 पोलीस कर्मचाऱ्याच्या खांद्यावर आहे ..येथे 1  ए. एस .आय. , 1 जमादार, 2 पोलीस कर्मचारी आळीपाळीने कर्तव्य बजावत आहेत. एखादी अनुचित घटना घडल्यास येथील पोलीस बळ तोकडे पडत असल्याने  चक्क पोलीस चौकीतच दोन राजकीय गटात राडा होऊन चाकु तलवारी चालल्याचा  इतिहास आहे .येथील गुन्हेगारीचा आलेख चढता आहे .काही वर्षापूर्वी दुहेरी हत्याकांड राज्यभर गाजले. खून ,चोऱ्या ,दंगली बलात्कार, विनयभंग चिडीमारी अशा अनेक घटना येथे  घडल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्या वर अतिरिक्त कामाचा ताण असल्याने  काही  गुन्ह्याच्या तपास कामात  पोलिसांना अपयश येत आहे .मेडशी गाव अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. लेडी सिंगम  पोलीस  अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी   लक्ष  घालून मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीच्या कामाला गती दयावी  अशी जनतेची मागणी आहे

विनोद तायडे वाशिम
8888277765

1 टिप्पणी:

  1. पोलीस स्टेशन ची सर्वात मोठी समस्या
    पोलीस भरती मध्ये मोठ्या प्रमाणात महिला पोलीस ,महिला अधिकारी यांची भरती झाली आहे ।
    पण त्या प्रमाणात सुविधा नाहीत ।
    महिला कक्ष आहेत पण तेथे अतिक्रमण झाले आहे ।
    महिला साठी स्वतंत्र प्रसाधन गृह नाहीत ।त्यामुले त्याची फार कुचंबणा होत आहे ।
    कृपया आपण वाशिम मधील 11 पोलीस स्टेशन चा दौरा करून समसया सोडविण्या साठी प्रत्यन करावा ।

    उत्तर द्याहटवा