मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

बंजारा समाजबांधवांची सहविचार सभा

बंजारा समाजबांधवांची सहविचार सभा

विनोद तायडे वाशिम

वाशीम : राष्ट्रीय गोर बंजारा साहीत्य परिषद द्वारा आयोजित यंदाचे दुसरे अ.भा. गोर बंजारा साहीत्य संमेलन नागपूर येथे येत्या 28, 29 ऑक्टोंबर 2017 ला संपन्न होत आहे. सदर साहीत्य संमेलन हे समाजाला योग्य दिशा देणारे दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन साहीत्य संमेलनाचे मुख्य संयोजक पत्रकार मनोहर चव्हाण यांनी कारंजा येथे 17 सप्टेंबरला झालेल्या सहविचार सभेत केले.
      ते पुढे म्हणाले की, नागपूर हे चळवळीचे शहर आहे. भारतीय स्वातंत्र चळवळीत विदर्भाचे आणी नागपूर शहराचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांचे महविद्यालयीन शिक्षण नागपूर या शहरातच झाले. नाईक साहेबांच्या नावाचे महाविद्यालयही याच शहरात आहे. त्यांचा पुर्णाकृती पुतळाही याच शहरात आहे. नागपूरपासून 30 ते 40 कि.मी. अंतरावर गिरड येथे लाखा बंजारा, आलम बंजारा आणी शेरूची समाधी आहे असे ही म्हणाले. सदर साहीत्य संमेलन हे जागतीक दर्जाचे होईल यात तिळमात्र शंका नाही. येणार्‍या पाहुण्यांसाठी दोन दिवस उत्तम प्रकारे जेवणाची, राहण्याची व्यवस्था राहील. यासाठी मोठमोठया पदांवरील अधिकारी कर्मचारी हिरारीने काम करत आहे. व्यवहार स्वच्छ प्रतिमेचा राहावा याकरीता सदर साहीत्य संमेलनाचे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.
    या सहविचार सभेला साहीत्य संमेलनाचे मुख्य आधारस्तंभ डॉ. प्रकाश राठोड, स्वागताध्यक्ष प्रा. मोहन चव्हाण, श्रीराम चव्हाण, साहीत्य संमेलनाचे कोषाध्यक्ष शेषराव चव्हाण, प्राचार्य लक्षमण राठोड, जि. प. समाजकल्याण सभापती जयकिसन राठोड, हिरासिंग राठोड, टि. व्ही. राठोड, प्रा. दिलीप चव्हाण, बलदेव चव्हाण, सुरेश चव्हाण यांच्यासह बहुसंख्य गोर बंजारा बांधव उपस्थित होते.

विनोद तायडे वाशिम
8888277765

1 टिप्पणी: