शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

किन्हीराजा पोलीस चौकीचा कारभार 36 वर्षापासुन चालतो अपुर्या व खाजगी इमारतीत

किन्हीराजा पोलीस चौकीचा कारभार 36 वर्षापासुन चालतो अपुर्या व खाजगी इमारतीत 
याच चौकीतुन चालतो 23 गावांचा कारभार














3 तपानंतरही पोलीस चौकीची अवस्था बिकटच 



4 पोलीस कर्मचार्यांवर 23 गावांचा भार

                            वाशिम जिल्हातील नागपुर औरंगाबाद महामार्गावरील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलीस चौकीची स्थापना सन 1980 मध्ये करण्यात आली असुन या चौकी अंतर्गत 23 गावांचा समावेश  करण्यात आला आहे परंतु गेल्या 36 वर्षापासुन स्वमालकीची ईमारत होण्यासाठी आणखी किती तप पुर्ण होण्याची वाट पाहावी लागणार असा प्रश्न ऊपस्थीत केल्या जात आहे ग्रामपंचायत कार्यालय परीसरात 10*15 च्या छोट्या समाज मंदीराच्या खोलीत पोलीस चौकीचा कारभार कित्येक वर्षापासुन चालु आहे. ही इमारत खुप जुनी असल्यामुळे इमारतीवरील स्लँबही काही वर्षापुर्वी कोसळलेला आहे.  या चौकीमध्ये स्नानगृह प्रसादनगृह ( शौचालय) व पाण्याची कोणत्याच प्रकारची सुविधा या इमारतीमध्ये नाही त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे मंगरुळपीर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या सोयता भोयता सह दुधखेडा तोरनाळा कार्ली किनखेडा जोडगव्हाण गुंज बोराळा एरंडा मैराळडोह गणेशपुर गिव्हा उमरदरी काळामाथा कवरदरी वाडीरामराव  पिंपळशेंडा सोनाळा वाकापुर दुबळवेल आदी लहाण मोठे 23 गावांचा किन्हीराजा पोलीस चौकी अंतर्गत समावेश आहे मुख्यता किन्हीराजा हे गांव अकरा हजार लोकसंख्या असलेले नागपुर औरंगाबाद महामार्गावर वसलेले आहे महामार्गावर अपघाताचे  प्रमाण नित्याचेच झाले आहे त्यामुळे आधीच 23 गावांचा पोलीसावर ताण व महामार्ग झाल्यामुळे आणखीनच त्या मध्ये भर पडली आहे चौकीवर फक्त 4 कर्मचारी आळीपाळीने  कारभार पाहत आहेत व कित्येक दिवसापासुन 10*15 खोलीत पोलीसांचा श्वास कोंडल्या जात आहे पोलीस चौकी अंतर्गत गावांचा विचार करता सद्याची चौकीची जागा अपुरी व सर्व सुविधांचा अभाव त्या मध्ये दिसुन येत आहे पोलीसांना काम करतांना तर जागे अभावी काही लोकांना चौकीच्या बाहेर बसवु आपले काम करावे लागत आहे.या  लक्षवेधी मागणी कडे वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षीका   पाटील मँडम व राजकिय नेत्यांनी लक्ष केंद्रीत करून किन्हीराजा पोलिस चौकीच्या नविन इमारतीचा प्रस्तावाचे गृहमंत्र्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.

महादेव हरणे 
9922224889

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

खबरदार, शौचालय असल्याचे बोगस दाखले द्याल तर.....



मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांचा ईशारा

निवडणुकीतील उमेदवारांसह ग्रामसेवकांवर होणार  कारवाई

पडताळणीसाठी जिल्हा परिषदेत विशेष पथकाची स्थापना

व्हॉट्सअप क्रमांकावरही माहिती देण्याचे लोकांना आवाहन

        दि. 16
                जिल्ह्यातील एकुण 289 ग्रामपंचायतीमध्ये टप्प्या टप्प्याने निवडणुका होत असुन यापौकी सध्या पहिल्या टप्प्यातील 273 ग्रामपंचायती मधील उमेदवारांकडुन उमेदवारी अर्ज सादर करण्यात येत आहेत. कोणत्याही निवडणुकीला उभे राहणाज्या उमेदवारांकडे शौचालय असणे बंधनकारक असल्याचे निवडणुक आयोगाने जाहिर केले आहे.
 अशावेळी अनेक उमेदवारांकडुन शौचालय असल्याचा खोटा दाखला जोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र आता यापुढे असे झाले तर त्या उमेदवारांसह संबंधित ग्रामसेवकांवरही कठोर कारवाई करण्याचा ईशारा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिला आहे.
दाखला द्या पण वस्तुस्थिती पाहुन..
निवडणुक असलेल्या गावातील उमेदवारांना शौचालयाचा दाखला देतांना संबंधित ग्रामसेवकांनी वस्तुस्थिती पाहुनच दाखला द्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केले आहे. शौचलय असणाज्यांना व ते वापरत असलेल्यांना शौचालय असुन ते त्याचा नियमित वापर करतात असा दाखला द्यावा. पण शौचालय नसल्यास शौचालय नाही असाच दाखला द्यावा. तसेच शौचालय असुन त्याचा वापर करत नसलेल्यांना शौचालय आहे परंतु त्याचा वापर करत नाहीत असा दाखला द्यावा आणि त्यावर लाल शाईने शेरा द्यावा असे निर्देश सीईओ पाटील यांनी दिले आहेत.
व्हॉटस्अप क्रमांकावरील माहितीची दखल
ज्या गावात निवडणुक आहे, त्या गावातील लोकांनी शौचालय नसलेल्या अथवा असुनही त्याचा वापर न करणाज्या उमेदवारांचे नाव आणि गावाचे नाव जि. प. च्या 8975767749 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मँसेज करण्याचे आवाहन जि. प. प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. लोकांचे नाव गुप्त ठेऊन संबंधितांवर निवडणुक नियमाचा भंग केल्याचा व खोटी माहिती देऊन निवडणुक अधिकाज्यांची दिशाभुल केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीईओ पाटील यांनी नियंत्रण कक्षाला दिले आहेत.
जिल्ह्यातील बहुसंख्य गावात निवडणुका असल्याने मोठ्या प्रमाणावर  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत.  या पाश्र्वभूमिवर शौचालय दाखल्याची पडताळणी करण्यासाठी जि. प. मध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडील माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या या इशारयामुळे खोटे दाखले देणाज्या ग्रामसेवकांसह काही उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे. यानिमित्ताने शौचालय बांधकामाला गती मिळेल अशी अपेक्षा उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी व्यक्त केली आहे.

महादेव हरणे
9922224889

किन्हीराजा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

लोकवस्तीत मुख्यरस्त्यावर असलेली घाण

  

प्रभागात मोठ्याप्रमाणात  घाणीचे साम्राज्य 
किन्हीराजा मध्ये सार्वजनिक एकही प्रसाधनगृह नाही

                          नागपुर औरंगाबाद महामार्गावर असलेल्या ग्राम किन्हीराजा जवळपास अकरा हजार लोकसंख्या असुन महामार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्दळ असुन बसथांब्यासह आठवडी बाजार ग्रामपंचायत शाँपींग सेन्टर मुख्य रहदारीचे ठिकाणावर प्रसादणगृह नसल्यामुळे ग्रामस्थ व्यापारी वर्ग बाहेर गावावरुन येत असलेले नागरीकासह महीला वर्गांची मोठ्याप्रमाणात कुचंबना होत आहे तसेच याच ठिकाणावरून शाळा व विद्यालया मध्ये जाण्याचा मुख्यमार्ग असुन या मार्गाचा उपयोग शौच करण्यासाठी करण्यात येत अाहे त्यामुळे मार्गावरून जात विद्यार्थीनींना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे स्वच्छता मिशन किन्हीराजा मध्ये कुचकामी ठरत असल्याचे  दिसत आहे गावामध्ये सुध्दा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असुन ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात येजा करतांना रोडवरील साचलेल्या डबक्यामुळे त्रास सहण करावा लागत आहे साचलेल्या डबक्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा वर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वारंवार ग्रामस्थांनी संबंधितास लेखी निवेदन देऊनही त्यावर कोणत्याच प्रकारच्या उपाय योजना ,हालचाली करतांना दिसुन आले नाही संबंधित प्रशासन किंवा आरोग्य विभागाने  त्वरीत दिलेल्या विनंती अर्ज व निवेदणाची दखल घेउण गावातील घाणीच्या समस्यांचा कायम स्वरूपी नायनाट करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

स्पर्धा परिक्षेच्या विशेष वर्गांना सुरूवात




सम्राट टाईम्स प्रतिनिधी


सोनपेठ : येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात 'करियर अॅण्ड कौन्सिलिंग सेल' च्या वतीने दरवर्षी महाविद्यालयात विविध स्पर्धा परिक्षांचे आयोजन, स्पर्धा परिक्षा ऊत्तिर्ण मान्यवरांचे मार्गदर्शन आदी ऊपक्रम राबवले जातात.
   याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणे सुलभ व्हावे यासाठी मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी व अंकगणित या घटकांच्या विशेष वर्गांचे आयोजन करियर व कौन्सिलिंग सेलकडून करण्यात आल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा.डाॅ.कल्याण गोलेकर यांनी दिली.
   या विशेष व्याख्यानापैकी "स्पर्धा परिक्षा व मराठी व्याकरण" या विषयावर प्रा. सखाराम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त क्षमतांचा विकास व्हावा. त्यानी स्पर्धा परिक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. या ऊद्देशाने महाविद्यालयाकडून वेळोवेळा असे प्रयत्न करण्यात येतात. यापुढे ही अंकगणित, चालू घडामोडी, विज्ञानाच्या विशेष वर्गाचे आयोजन केले जाणार असल्याचे डाॅ.गोलेकर के.एम. यांनी कळवले असून याचा सोनपेठ परिसरातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

  या प्रसंगी व्याख्यानाची भूमिका, कार्यक्रमाचे प्रास्ताविक , व्याख्यात्यांचा परिचय व सत्कार करून प्रा.सखाराम कदम यांचा जवळपास दिड तासाचा हा विशेष वर्ग घेण्यात आल्याचे COC विभागाकडून कळविण्यात आले.

सामाजीक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तीमत्व डाॅ पंडीत निवर्तले



फुलचंद भगत 

मंगरुळपीर येथील राजकीय नेते व समाजसेवक साहीत्यीक डाॅ विकल पंडीत यांचे दि 15 रोजी सकाळी चार वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मृत्युसमयी त्याचे वय 66 होते            
                           1984 ते 1992 पर्यत ते नगरसेवक व आरोग्य सभापती होते तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर समीती स्मारक उभारले त्यावेळी नगरपालीकेत स्वबळावर सत्ता स्थापन करुन समतावादाचे राजकारण केलै ऐवढेच नव्हे तर त्यांनी विवीध समाजोपयोगी उपक्रम राबविले यामध्ये विशेषता चिकुन गुणीया आजार तालुक्यात पसरला त्यानी या चिकुनगुणीया रुग्नावर उपचार करुन त्यांना आजार मुक्त केले व कुष्ठरोग निर्मुलनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तसैच त्यांनी लिहलैली भावगीते व सास्कृतिक क्षेञात अजुनही रसिकांच्या ओठावर आहेत याशिवाय सत्यघटनेवर आधारित "नागीली"नाटक सेंसार बोर्डाने नुकतेच संमत केले असुन त्यांनी शेवटच्या क्षणापर्यत ऊपयोगी पडावे या ऊदात्त हेतुने देहदानाचा संकल्प केला होता.येथिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवन्यात आले होते.यावेळी सामाजीक क्षेञातील,तथा राजकिय,साहित्यिक,विविध सामाजिक संघटना आदि मान्यवरांनी भेट देवून आदरांजली वाहिली.त्यांचे पश्चात पत्नी,तिन मुले एक भाऊ व एक बहीण आहे.

*प्रतिक्रीया*- समाजभुषण डाॅ.विकलपंडित यांच्या निधनाने फुले शाहु आंबेडकरी विचाराचा वटवृक्ष कोसळला
-सामाजिक कार्यकर्ता-सुभाष हातोलकर

सामाजिक,राजकिय व सांस्कृतिक कार्यात सर्देव अग्रेसर असणारा महाकाय वटवृक्ष ऊमळला असुन तालुक्यातील आंबेडकरी जनता पोरकी झाली.
-सामाजिक कार्यकर्ता,फुलचंद भगत

समता व बंधुत्वतेचा प्रचार आणी प्रसार करणारा शांतीदुत हरवला.
-प्रा.अरूणकुमार इंगळे
माजी सदस्य,शिक्षण मंडळ

डाॅ.विकलपंडित यांच्या निधनाने धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणारा लढवय्या नेता हरवला,
-सामाजिक कार्यकर्ता-शफायतभाई

मागासवर्गीय चळवळीचा समतादुत हरविल्याने सामाजिक क्षेञात पोकळी निर्माण झाली.
-पञकार,सुनिल भगत

साहित्य व रंगभुमि व सामाजिक क्षेञातील एक दिग्दर्शक हरविला आहे.
-प्रा.ज्ञानदेव बन्सोड

कै.रमेश वरपुडकर महाविदयालयात फुटबाॕल स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

कै.रमेश वरपुडकर महाविदयालयात फुटबाॕल स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

                     सोनपेठ  महाराष्ट्र  फुटबाॕल मिशन   1 मिलियन  या कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या फुटबाॕल स्पर्धेला सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात खेळाडुंनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला  दि. 15 सप्टेबर रोजी सकाळी  11 वा.  स्पर्धेचे उदघाटन पत्रकार सुधीर बिंदू, पत्रकार गणेश पाटील, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, प्राचार्या शेख शकिला  शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.गोविंद वाकणकर, प्रा.डाॅ. बा.मु.काळे, प्रा.डाॅ.एम.डी.कच्छवे, प्रा.डाॅ. वनिता कुलकर्णी , प्रा.अंगद फाजगे ,प्रा.डाॅ.मुकूंदराज पाटील, प्रा.डाॅ. संतोष रणखांब यांच्या हस्ते करण्यात आले.
 कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, सुरूवातीस खेळाबाबत फुटबाॕल प्रशिक्षक सय्यद शहबाज यांनी मार्गदर्शन केले. खेळाचे उद्घाटन करण्यापुर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी.अधिकाधीक खेळाडू व नागरिक फुटबॉल खेळाकडे आकर्षित व्हावेत,  खेळाची आवड निर्माण होऊन विद्यार्थी व्यसनाकडे जाणार नाहीत व आरोग्यवान नागरीक निर्माण होतील हा उद्देश समोर ठेवून स्पर्धा आयोजित केली असल्याचे  प्रा.डाॅ. संतोष रणखांब यांनी स्पष्ट केले.
  स्पर्धेत  वर्गनिहाय मुला मुलींच्या एकुण 6  संघानी  सहभाग घेतला होता . यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात 12  विज्ञानने तर वरीष्ठ गटात बी. एस्सी प्रथम वर्षाच्या संघानी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
  विजेत्या संघातील खेळाडुंचे उपस्थितीत मान्यवरांमार्फत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रा.महालिंग मेहत्रे प्रा.पंडीत राठोड प्रा.अंगद गायकवाड प्रा.जगदीश भोसले प्रा. जिवन भोसले प्रा. सतिश वाघमारे प्रा.विठ्ठल मुलगीर प्रा.संतोष वडकर प्रा.सुरेश मोरे प्रा.आरती बोबडे प्रा.ममता देवराये  दत्ता सोनटक्के चंद्रपाल पटके भागवत हाके , संतुक परळकर यांनी सहकार्य केले.

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

गंगापूर महसूल कर्मचारी संघटनेचे एकदिवसीय लेखनी बंद आंदोलन


   गंगापूर : तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि तलाठी शिवाजी मुरकुटे यांना धक्काबुकी व मारहाण करणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचा-यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले आहे़ या आंदोलनात तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने महसूलचा कारभार दिवसभर ठप्प पडला होता .
       अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़. राहुल गांधी यांच्या सभेच्या दिवशी कर्तव्यावर उपस्थित असलेले परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना सभामंडपात जाण्यास मज्जाव करण्यात आला़. तहसीलदार कडवकर यांनी स्वत:ची ओळख देवून ओळखपत्र दाखविल्यानंतरही अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी त्यांना धक्काबुक्की करून सभामंडपात प्रवेश दिला नाही़. तालुकास्तरीय दंडाधिका-यांना दिलेली ही वागणूक निषेधार्ह असून, या विरुद्ध तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनांबरोबरच महसूल कर्मचारी संघटनांनीही आंदोलनाची भूमिका घेतली़ आहे असे गंगापूर महसूल कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष करण जारवाल यांनी सांगितले.
    यावेळी  गंगापूर महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव संदिप वाडीकर ,कार्याध्यक्ष रामदास बोठे ,बागेस एफ ए ,बाबुलाल कादर ,एच एन जगताप,ए बी चिकड ,एम एन क्षीरसागर,कचरु तुपे आदि कर्मचारी उपस्थित होते

प्रियदर्शिनी कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिन साजरा



महेंद्र महाजन जैन 

....रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील प्रियदर्शिनी कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिन कार्यक्रम संपन्न झाला .महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .यावेळी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य बी .पी .इंगळे यांची उपस्थिती होती ..यावेळी प्रा .वसंतराव देशमुख ,प्रा .मिलिंद इंगळे ,प्रा .संतोषराव देशमुख ,प्रा .सौ .संगीता रेखे ,प्रा .प्रमोद हुंबाड ,प्रा .संजय पांढरे ,प्रा .पंडितराव देशमुख यांची उपस्थिती होती .मान्यवरमंडळीचे  प्राचार्य बी पी इंगळे  यांनी स्वागत करून नविन पायंडा निर्माण केला .प्राचार्य इंगळे हे हिंदी विषयाचे अध्यापक असल्यामुळे आणि त्यांचा हिंदी विषयाचा गाढ़ा अभ्यास असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषा राष्ट्रभाषा का असावी आणि हिंदी भाषेला ज्या कवी व साहित्यिकानी समृद्ध केले त्यामध्ये कवी कालीदास ,तुळशीदास ,हरिवंशराय ,कवी कबीर याची माहिती दिली आणि दोहे गायन केले आणि हिंदी भाषेतून मार्गदर्शन केले .संचालन प्रा .संजय भालेराव यांनी हिंदी भाषेतुन करून श्रोत्यांची मने जिंकली .आभार प्रा .अशोक गंगावने यांनी व्यक्त केले .यावेळी शिक्षक ,विद्यार्थी व कर्मचारी यांची उपस्थिती मोठया संख्येने होती .

महेन्द्र महाजन जैन
9960292121 रिसोड

स्वच्छता हीच सेवा अभियानातुन शहरी व ग्रामिण भागात जनजागृती

स्वच्छता हीच सेवा अभियानातुन शहरी व ग्रामिण भागात जनजागृती



पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जिल्ह्यात शुभारंभ

विनोद तायडे

वाशिम
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता
मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य
संस्थांमध्ये दिनांक 15 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच
सेवा हे विशेष जन जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा
जिल्हास्तरीय शुभारंभ दि 15 सप्टेबर रोेजी मानोरा तालुक्यातील विठोली या
गावात ना. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी खा. भावना गवळी, जि. प. अध्यक्ष हर्षदा दिलीपराव देशमुख,
उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जि. प. चे
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह सर्व सभापतींची उपस्थिती
राहणार आहे.
हे अभियान शहरी व ग्रामिण भागात राबविण्यात येणार आहे. याबाबत
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील
यांनी याबाबत सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार व विभाग प्रमुख यांची एक
बौठक घेऊन याबाबत सविस्तर सुचना दिल्या. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी
कार्यालय, जिल्हा परिषद, तालुका स्तरीय वर्ग-1 ते वर्ग 3 दर्जाचे
अधिकारी- कर्मचारी यांना जिल्ह्यातील एकेक गाव दत्तक देण्यात येणार आहे.
सदर गावात स्वच्छता मिशन राबविण्यासाठी पुढाकार व समन्वय ठेवण्याची
जबाबदारी या दत्तक अधिकारी- कर्मचारी यांची राहणार आहे. याबाबत
जिल्हाधिकार द्विवेदी यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले आहेत.
या अभियानादरम्यान प्रत्येक गावात स्वच्छता दिंडीचे आयोजन करणे, शौचालय
निर्मिती करिता शोषखड्याचे ले-आऊट देणे व प्रत्यक्ष कामांना सुरुवात करणे
आणि यासाठी दत्तक अधिकारी- कर्मचारी यांच्यासह गावातील अन्य कर्मचारी,
ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, आशा- अंगणवाडी सेविका, ग्रा. प. कर्मचारी,
जलसुरक्षक आदिंनी गृहभेटी देऊन शौचालय बांधकामांना प्रोत्साहन देण्याचे
अपेक्षित आहे. त्याच बरोबर शाळा- अंगणवाडी मध्ये स्वच्छ शाळा दिवस पाळणे
व प्रभात फेरीचे आयोजन करुन स्वच्छतेचा संदेश देण्याचे  आणि प्राथमिक
आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र याठीकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याच्याही
सुचना आहेत. या अभियाना दरम्यान शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस
डेपो ई. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत संबंधित
गटविकास अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. विविध पध्दतीने
जनजागृती उपक्रम राबवुन जिल्हा स्वच्छ बनविण्यासाठी सर्वांनी योगदान
देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश पाटील आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले आहे

विनोद  तायडे वाशिम
8888277765

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

ब्रह्माकुमारीज विद्यालयात राजयोग शिबिर आरंभ

ब्रह्माकुमारीज विद्यालयात राजयोग शिबिर आरंभ

  महेंद्र महाजन जैन रिसोड      
           
                   
-प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय रिसोड येथे सात दिवशीय राजयोग शिबिराचा १३ सप्टेंबर बुधवारला प्रारंभ झाला.१३ ते १९ सप्टेंबर चालणाऱ्या या शिबिराला विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी ज्ञान दान करणार आहेत. दर महिन्याला या विद्यालयातून राजयोग शिबिराचे आयोजन केले जाते प्रत्येक शिबिराला शिबिरार्थी स्वयंस्फूर्तीने नाव नोंदवून सहभाग नोंदवीत आहेत. ब्रह्माकुमारी ज्योती दीदीं विद्यालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवित असतात शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयाने रिसोड तालुक्यातील १६०शिक्षकांचा सत्कार घेतला त्यातील अनेक शिक्षक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. शिबिराच्या नियोजनाकरिता ज्योती दिदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे ज्ञानार्थी परिश्रम घेत आहे

महेन्द्र महाजन जैन
9960292121
सोनपेठला ज्ञानपेठ बनवण्याचा ध्यास घेतलेला हाडाचा शिक्षक : शौकत पठाण



प्रा.डॉ. संतोष रणखांब

सोनपेठः  तालुक्याला ज्ञानपेठ बनवण्याचा ध्यास घेऊन कार्य करणारे गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी अनेक उपक्रम राबवत शिक्षकांचे मनोबल उंचावले व ज्ञानरचनावाद, ई - लर्निंग इत्यादीसाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी आज चक्क चार तास शिक्षकांचा खडू व फळ्याचा वापर करत तासच घेतला.
 शिक्षक पायाभुत चाचणीतील प्रगत मुल कसे ठरवावे यात गोंधळलेले असल्याचे लक्षात येताच मुलभुत क्षमता व प्रश्नपञीकेतील प्रश्न याचा सबंध शोधताना संभ्रमावस्थेत आहेत असे सोनपेठ येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः तालुक्यातील सर्व शिक्षकासाठी हातात खडु घेतला,व पायाभूत चाचणीतुन प्रगत विद्यार्थी कसे ठरवावे यासंदर्भात स्वतः तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा घेतली सतत चार तास
"खडु-फळा"यांच्या साहाय्याने त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्यातील एक आदर्श शिक्षक सर्व शिक्षकांना अनुभवयास मिळाला व त्यामुळे शिक्षकांचा उत्साह वाढला आहे.
 गटशिक्षणाधिकारी पठाण यांनी सलग चार तास शिक्षकांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत सुरू आसलेल्या पायाभूत चाचणी बाबत प्रगत विद्यार्थी कसे ठरवावेत,भाषा व गणिताचे मुलभुत क्षमतेचे प्रश्न कोनते? तसेच चाचणी नंतर अप्रगत मुलांना प्रगत करण्यासाठी   काय उपचारात्मक उपाययोजना कराव्यात याविषयी सखोल कृतीयुक्त मार्गदर्शन केले.
यावेळी तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
या प्रशिक्षणातील त्यांचा आटापिटा हा शिक्षकांना प्रेरणा देणारा ठरला आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले सुभाषराव सावंत यानी भरले 89 कर्ज माफीचे अर्ज

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले सुभाषराव सावंत यांनी
भरले 89 कर्ज माफीचे अर्ज

सोनपेठ : तालुक्यातील अनेक शेतकरी अडचणीत सापडले असताना त्यांचे फॉर्म भरण्यासाठी भाजप तालुका उपाध्यक्ष सुभाषराव सावंत यांनी त्यांच्या रहात्या ठिकाणी जाऊन अर्ज भरून दिले.
 आनंदनगर वसाहत येथील 'छत्रपती शिवाजी महाराज' कर्ज माफी योजने अंतर्गत मा.'मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस' यांनी जाहीर केलेल्या कर्ज माफी योजनेचा लाभ हा सर्व सामान्य शेतकऱ्यांना मिळावा. या हेतूने या योजनेपासून शेतकरी वंचीत राहू नयेत या उद्देशाने 'आनंदनगर वसाहत' बोदंंरगाव  येथील कर्ज माफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांचे के सी सी नंबर व पुनःर्गठित कर्जाचे 'KCC' नंबर SBI शाखा सोनपेठचे 'शाखाधिकारी' श्री.शेळके साहेब यांच्या कडून उपलब्ध करून  कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या 89 शेतकऱ्यांचे 'ऑनलाईन पद्धतीने' अर्ज भरून दिले. वसाहत मध्ये व बोदंरगाव,वंजारवाडी तांडा,बेलंबा,थडी उक्कडगाव, धामोनी इत्यादी गावात जाऊन शेकडो फॉर्म रीतसर पूर्णपणे भरून घेतले.
           या कामी त्यांना 'स्माईल कॉम्पुटर' चे 'संचालक' श्री. आसारामजी काळे व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर सावंत,मोतीराम काळे या 'ऑपरेटरने' बहुमोलाचे सहकार्य केले.

सोनपेठ महसुल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

सोनपेठ महसुल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन 

प्रा. डॉ. संतोष रणखांब

सोनपेठ : येथिल महसुल प्रशासनाच्या वतीने परभणी येथे नायब तहसिलदारांना मिळालेल्या अरेरावीच्या वागणूकीविरूद्ध आज बुधवारी सुध्दा सुरूच होते.यावेळी या आंदोलनात सोनपेठचे नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तहसिलदार
जीवराज डापकर,एच. जी. मोरे, ए. एम. घनसावंत, बी.पी. बचाटे, एन. बी. पिंपळे, सी.ए. कुलकर्णी, जी. बी. विरमाले, प्रशांत हासोरीकर, डी. सी. सरोदे, जी. आर. राठोड, एस.एस. शिंदे, एस. डी. जाधव , बी. डी. काळे, व्ही. के. कनके, एस. आर. गडप्पा, एम. पी. चव्हाण, ए. व्ही. जामोदे, रफिक शेख, मंडळ अधिकारी शिवाजी कराड, ब्रह्मानंद जमशेटे, पांडुरंग फुलसावंगे, संजय गोटे, शाहुराज दीक्षित, सोमनाथ एकलिंगे, इसा सय्यद आदी सहभागी झाले होते.

पुनर्वसित गांवाना विकासाठी निधी द्या युवासेना

पुनर्वसित गांवाना विकासाठी निधी द्या युवासेना 

संपत रोडगे गंगापुर प्रतिनिधी 

सोमवारी दिनांक ११ रोजी जिल्हा अधीकारी कार्यालयऔरंगाबाद येथे जिल्हा       अधिकारी यांना भेटून असे निवेदन करण्यात आले की नेवासा तालुक्यामध्ये ७/७/१७ रोजी पुनर्वसित गावांच्या विकासासाठी शासनाने चार कोटी ८१ लाख रुपये मंजूर केले परंतु गंगापूरमध्ये पुनर्वसित गावांसाठी एक रुपया देखील मंजूर झाला नाही म्हणून जिल्हाधिकारी यांना पुनर्वसित गावांना विकासनिधी मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले.युवा सेना जिल्हा अधिकारी मा संतोष माने पा यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले प्रसंगी जि प सदस्य दिलीप निरफळ, युवा सेनेचे तालुका अधिकारी मच्छिंद्र देवकर, मुकुंद जोशी,अमोल माने, अर्जुन कराळे, सुभाष माने आदी उपस्थित होते.

 संपत रोडगे
 9420486389

जागतिकीकरण आणि भारत पुस्तकाचे प्रकाशन

जागतिकीकरण आणि भारत पुस्तकाचे प्रकाशन



           सोनपेठ : येथिल कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संतोष रणखांब व  प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे, प्रा. डॉ. कल्याण गडकर राजक्रांती वलसे संपादित जागतिकीकरण आणि भारत या पुस्तकाचे जालना येथे संपन्न झालेल्या पहिल्या श्रमिक साहित्य संम्मेलनाच्या समारोप सत्रात डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. डी.एल कराड, कॉ. कुमार शिराळकर, अण्णा सांवत यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
जागतिकीकरण आणि भारत या ग्रंथात एकुण बाविस लेख असून राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय, ग्रामिण राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, संस्कृती, भाषा,  विविध कष्टकरी चळवळी, समग्र भारतीय समाज घटकांवरील जागतिकीकरणाचा झालेला परिणाम व होणारा परिणाम या विषयावर लेख आहेत. आजच्या परिस्थितीत अशा विषयाचे पुस्तक हे अनेक विचारांना चालना देणारे आहे,  असे मत श्रमिक साहित्य संम्मेलनातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
या  पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्राचार्य वंदना तिडके व प्रा. डॉ. यशवंत सोनूने यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी अनेक साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते.
या बद्दल प्रा. डॉ. रणखांब यांचे हशिप्रचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

शिक्षणाधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

शिक्षणाधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

विनोद नंदागवळी 

       कामरगाव येथील जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये गेले ५-६ वर्षांपासून शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे कोणाचे लक्ष्य नाही
वर्ग ११ व वर्ग १२ विज्ञान सत्र २०१७-१८ या सत्रामध्ये शिकत असून व शाळा सुरु होऊन तीन महिने होऊन सुद्धा आम्हाला जि. प. कनिष्ठ महाविद्यालय, कामरगाव येथे शिक्षक शाळेमध्ये शिकविण्याकरिता विज्ञान शाखेला शिक्षक मिळाले नाही व सत्र २०१६-१७ मध्ये शिक्षकाविनाच शाळा करावी लागली.
काही शिक्षक सुरवातीस शिकविण्यास येत होते ते पण विनामूल्य होते पण काही कारणास्तव मा. मुख्याध्यापक मॅडम तुम्ही त्यांना शिकविण्यास नकार दिला. वर्ग १२ हा भवितव्य घडविणारा वर्ग आहे पण काही वर्गाला विज्ञान शाखेला शिकविण्याकरिता शिक्षक नाही. व अश्या कारणामुळे आमचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे व होत आहे.
येत्या आठ दिवसाअगोदर शिक्षक विज्ञान शाखेला शिकविण्याकरिता खासगी किंवा शासकीय शिक्षक  आले नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यामागे जि. प. कनिष्ठ महाविद्यालय कामरगाव व कामरगाव लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. व विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत प्रशासकीय अधिकाऱ्याने पाहू नये अन्यथा येत्या १० दिवसात शाळेवर विज्ञान शाखेचे विद्यार्थी टाळा ठोको आंदोलन करण्याच्या तयारीत असुन  आम्ही सर्व विज्ञान शाखेचे विद्यार्थी वेळ आल्यास  आमरण उपोषण देखील करू याची मुख्याध्यापक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी व कामरगाव लोकप्रतिनिधींनी दाखल घ्यावी. अशा  भावना विद्यार्थांनी व्यक्त केल्या आहे.
विनोद नंदागवळी
9673954516

कायगाव येथे युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

कायगाव येथे युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

   संपत रोडगे गंगापुर प्रतिनिधी 
   

                   गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे एका​ युवकाने राहत्या घरातील पत्र्यांच्या पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना१२ सप्टेंबर रोजी दुपारी  साडे चार ते पाच वाजेदरम्यान  दरम्यान घडली.
    पोलिसांकाडुन  मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव येथील प्रभाकर उत्तम फाजगे  वय (३०)वर्षे या तरुणाने मंगळवारी दुपारी  साडे चार ते पाच च्या दरम्यान राहत्या घरातील पत्र्यांच्या पाईपला दोरीने फाशी घेवुन आत्महत्या केली. त्याची आई प्रभाकर यास आवाज देत त्याच्या खोलीत गेली असता मुलगा फासावर लटकल्याचे पाहील्यावर तिने आरडाओरडा केला असता आजुबाजुला असलेल्या नागरीकांनी त्याला खाली घेऊन गंगापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत झाल्याचे घोषित केले.
       या घटनेची गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद  करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेडकांस्टेबल बी.के.कासोदे ,पोलिस नाईक जे.पी पाटील हे करत आहे.
संपत रोडगे 9420486389


जेवणात खावी भाकरीच..?

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे –*

*1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.*

*2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.*

*3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.*

*4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.*

*5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.*

*6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.*

*7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.*

*8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.*

*9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.*

*10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.*

ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.

ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर ( गोड ज्वारीपासून ) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.

*तुम्हाला माहित नसलेले भाकरीचे प्रकार जाणून घ्या :-*

भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे. सांज-सकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, कि हातासरशी त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोन-चार प्रकार ही करुन टाकतात. पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. तरी ते काम सोपे पण नाहीच.

आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात. या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी, फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने खालील प्रकार सोपे आहेत.

भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो, या युक्ती प्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत. भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते.  ८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा
असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.

*१) ओतलेली भाकरी :-*

हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुन ही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची (सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला. थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला. (कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल) गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता
मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा. कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी हे तंत्र वापरता येईल.

*२) गाजराची भाकरी :-*

गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या. एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका, त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमी-जास्त लागेल पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.

*३) कांदा भाकरी :-*

मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग त्यात पिठ भिजवा. आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी, फ़क्कड बेत जमतो.

*४) बटाटा भाकरी :-*

बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही. मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि
आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.) त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा. या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)
हि भाकरी कुरकुरीत होते.

*५) वांग्याची भाकरी :-*

भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून
त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात,) मिसळा. हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात. लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.

*६) लसणाच्या पातीची भाकरी :-*

मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाही तरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात. यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका. झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती (त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून
घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.

*७) फ़णसाची भाकरी :-*

८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.
मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.

*८) शेपूची भाकरी :-*

वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते. या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.

*९) ऊसाच्या रसातली भाकरी (दशमी) :-*

ऊसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.
जाड फॉइल वापरुनही करता येते.

*१०) गुळाची भाकरी :-*

अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात. या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.

*११ ) सोया चंक्सची भाकरी :-*

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत, मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा. मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट
व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले कि त्यात कणीक घालून मळावे. याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण देता येतील.

*१२) केळ्याची भाकरी :-*

जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरी प्रमाणेच भाकरी करता येते.

संताची शिकवण माणसाला सकारात्मक उर्जा देते -: जिवराज डापकर

संताची शिकवण माणसाला सकारात्मक उर्जा देते -: जिवराज डापकर 

प्रा. डॉ. संतोष रणखांब

सोनपेठ :
तालुक्यातील नरवाडी येथील नगरेश्वर मंदिरातील "पंचपदी"भजनासाठी आवर्जून उपस्थित असलेले तहसिलदार जिवराज डापकर यांनी संताची शिकवण सकारात्मक उर्जा मिळत आसल्याचे प्रतिपादन केले.
नरवाडी येथील नगरेश्वर मंदिरात परंपरेनुसार होत आसलेल्या व पंचक्रोशीत प्रसिध्द आसलेल्या "पंचपदी "भजनाला सोनपेठ चे तहसिलदार जिवराज डापकर यांनी सदिच्छा भेट दिल्यानंतर येथील भजनी मंडळीसोबत हितगुज करत येथे उपस्थित आसलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी डापकर बोलत होते,
सांप्रदायिक शिकवणीतील माणसे ही आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने वागतात त्यामुळे त्यांचे सौजन्य समाजाला प्रेरणादायी ठरत आसुन संताची शिकवण ही माणसाला सकारात्मक उर्जा देत आसते आणि म्हणुनच मी अशा कार्यक्रमात सहभागी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नरवाडी येथील नगरेश्वर मंदिरात दर सोमवारी पंचपदी भजन मोठ्या उत्साहात येथील ग्रामस्थ करत असतात तर आमावश्या झाल्यानंतरच्या सोमवारी नगरेश्वराची पालखी मिरवणुक मंदिर परिसरात ग्रामस्थ काढत आसतात.
यावेळे तहसीलदार जिवराज डापकर यांच्यासह प्रा.डॉ.संतोष रणखांब व सुभाष सुरवसे हे सुध्दा उपस्थित होते.
यावेळी पंचपदी भजनाला शिवाजी पांडुळे,
,श्रीधर जोगदंड, बालासाहेब पांडुळे, रामेश्वर मस्के,माधुआप्पा गांगर्डे, लक्ष्मण मस्के, भिमा गुरव,कुंभकर्ण गांगर्डे, मदन पांडुळे, तुकाराम जोगदंड, तुकाराम डिंगने, ज्ञानेश्वर चोपदार,रामकिशन धुमाळ,भागवत आंकुशे,आशोक गांगर्डे, सुनिल नरवाडकर, मारोती तोंडगे,प्रभतराव गांगर्डे, विश्वनाथ हेंडगे, शाम नरवाडकर,आश्रुबा वायंगडे, दगडु जोगदंड,गंगाधर झगडे
यांच्यासह महिला वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार जिवराज डापकर यांचा ग्रामस्थ व राजे शिवाजी मंडळाकडुन सत्कार करण्यात आला.

गंगापूर शहरातील भारनियमन रद्द करा : नगराध्यक्ष वंदना पाटील यांची मागणी

गंगापूर शहरातील भारनियमन रद्द करा : नगराध्यक्ष वंदना पाटील यांची मागणी


    संपत रोडगे  गंगापूर
गंगापूर शहरात सध्या विद्युत वितरण कंपनी कडून मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन सुरू आहे . आगामी सण उत्सवाच्या तोंडावर करण्यात येत असलेले भारनियमन तात्काळ रद्द करण्यात यावे , अशी मागणी नगराध्यक्ष वंदना प्रदीप पाटील यांनी विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे .
       निवेदनात म्हटले आहे की, आगामी नवरात्र उत्सवात भारनियमन सुरू करणे अन्यायकारक आहे . सध्या सुरू असलेला उकाडा असह्य होत आहे . या उकाड्याने वृद्ध , आजारी लोक व लहान मुलांना फार त्रास होत आहे . त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने सध्या सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करावे , नसता विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालया समोर तिव्र आंदोलन छेडले जाईल , असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे
    संपत रोडगे  9420486389

पत्रकारानों समाजाच्या विकासासाठी लेखणीचा उपयोग करा

पत्रकारानों  समाजाच्या विकासासाठी लेखणीचा उपयोग करा 

 श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष - नितीन पगार

महेन्द्र महाजन

  रिसोड :--  श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन  स्थानिक  माऊली  संकुलामध्ये ता.9 सप्टेंबर ला संपन्न झाले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक  म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हा  अध्यक्ष  नितीन पगार यांनी  उपस्थित  पत्रकार बांधवाना वरील प्रमाणे  मार्गदर्शन  केले.यावेळी उद्घाटक म्हणुन  तहसीलदार आर.यु.सुरडकर.ठाणेदार राजेंद्र  पाटील,
पत्रकारांना मार्गदर्शन करतांना नितिन पगार
नगराध्यक्ष यशवंतराव  देशमुख होते.
 श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उध्दगाटन तहसिलदार आर.यु.सुरडकर ठाणेदार राजेंद्र  पाटील  नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख जिल्हाध्यक्ष पगार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितीत श्रमिकपत्रकार संघाचे राज्यसदस्य नागेश घोपे.अतिश देशमुख तालुकाअध्यक्ष दिपक कुदळे होते .तद्वतच आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे  मान्यवरानी पुजन केले आले.यावेळी तहसीलदार  सुरडकर यांनी पत्रकार हा लोकशाहीचा  चौथा  आधारस्तंभ आहे.शासणाच्या प्रत्येक  बाबीचा प्रचार_प्रसार करण्यासाठी पत्रकाराचे मोलाचे योगदान लाभते.त्यामुळे पत्रकारांची भुमिका  हि प्रत्येक  बाबतीमध्ये  महत्वाची ठरते.तर ठाणेदार राजेंद्र  पाटील यांनी विचार व्यक्त  करताना म्हटले कि दैनंदीन जिवनामध्ये प्रत्येक बाबीकडे लक्ष देण्याचे काम पोलिस प्रशासाचे आहे. परंतु एखादी घटना घडल्यास पोलिस प्रशासना आगोदर पत्रकार त्या घटनेची माहिती प्राप्त  करतात. त्यामुळे  सुतावरून स्वर्ग  गाठण्याची  कामगीरी  फक्त  पत्रकारच करु शकतात.तर जेष्ठ  पत्रकार  नितीन पगार यांनी  विचार व्यक्त  करताना पत्रकारीतेची लेखणी हि सत्याच्या मार्गानेच चालली पाहीजे.वंचितांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारानी आपली लेखणी झीजवीने आवश्यक आहे. आशाप्रकारे विचार मांडले .तत्पूर्वी  मान्यवरांचे रिसोड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने  स्वागत  करण्यात आले.यावेळी  प्रणय निर्बान. मराठी  पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष  पि.डी.पाटील.सतिष चोपडे. संतोष गोभाशे.गजानन बानोरे.प्रा.रविंन्द अंभोरे.सचिव विवेकानंद  ठाकरे.दिपक सोनुने .गोपाल खडशे.तुकाराम फुके.संतोष चर्हाटे.अर्जुन पाटील खरात.सुरेश गीरी .शेख अन्सोरौदीन. आनंत भालेराव.रूपेश बाजड बन्टी देगावकर गजानन गाडे.महादेव घुगे.महेंद्र महाजन. युवा कवी चाफेश्वर गांगवे यानी केले.तर आभार संतोष गोमासे  यांनी मानले.

महेन्द्र महाजन जैन रिसोड
9960292121

अपंगांच्या 3%निधी तात्काळ खर्च करा -- प्रहार

अपंगांच्या 3%निधी तात्काळ खर्च करा -- प्रहार 

संपत रोडगे गंगापुर
तालुक्यातील ग्रामपंचायतीनी अपंगांचा 3%निधी तात्काळ खर्च कराया मागणीसाठी मा,गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर येथे प्रहार टीम गेली असता तेथे कोणताही जवाबदार अधिकारी उपस्तीत नव्हता म्हणून पंचायत समितीचे शिपाई यांच्याकडे निवेदन देऊन प्रशासनाचा गलथान कारभाराचा निषेध केला.
 ३% निधी खर्च करण्यासंदर्भात मा,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद औरंगाबाद यांचे आदेश असतांना तालुक्यातील ग्रामपंचायतीने 30ऑगस्ट रोजी विशेष ग्राम सभा बोलून निधी खर्च करणे आवश्यक असतांना ग्रामपंचायत ने  आदेशाची पायमल्ली केली म्हणून गटविकास अधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा अहवाल 14 सप्टेंबर पर्यंत प्रहार पक्ष्याने मागितला 18सप्टेंबर पर्यंत निधी खर्च न केल्यास मा ,बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार स्टाईल ने आंदोलन छेडण्यात येईल आसा ईशारा देण्यात आला. हे तसेच ३% खर्चाचे निवेदन पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांना हि देण्यात आले.
निवेदनावर ता प्रमुख भाऊसाहेब शेळके पाटील,जिल्हा प्रमुख संजय चव्हाण ,जिल्हा संपर्क प्रमुख राऊफ पटेल जिल्हा युवा आघाडी प्रमुख कल्याण जाधव,गंगापूर शहर अध्यक्ष ज्ञानदेव काळे पाटील ,ता उप प्रमुख बाबासाहेब खंडागळे,संभाजी गावंडे ,राजेंद्र गावंडे, ता सचिव राहुल पारखे,बाबासाहेब कान्हे,संतोष डोंगरे,अपंग क्रांतीचे शहर अध्यक्ष रमेश खर्डे,व इतर प्रहार सैनिकांच्या स्वाक्षर्या आहेत.
    संपत रोडगे मो. 9420486389

सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रश्न प्रलंबित

मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रश्न प्रलंबित

विनोद तायडे
वाशिम
मेडशी येथे  गुन्हेगारीचा आढावा घेत पोलीस महासंचालकांनी मेडशी पोलीस  स्टेशन निर्मितीच्या हालचाली सुरू केल्या मात्र गत 2  वर्षा पासून  पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रश्न प्रलंबित आहे .मागील काही गुन्हेगारीच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला .मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर  वेगाने सुरू झाल्या .काही वर्षाआधी राजकीय  दोन गटात झालेल्या दंगलीने पोलिसांची दमछाक झाली . पोलीस महासंचालकाने गुन्हेगारीचा अहवाल मागविला. .वरिष्ट पातळीवर खलबत होऊन मेडशी पोलीस चौकीचे रूपांतर  पोलीस स्टेशन मध्ये करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.पोलीस स्टेशन निर्मितीला वेग आला . पोलीस महासंचालकाने तत्कालीन पोलीस अधिक्षकाना अहवाल सादर करण्याचे  आदेश दिले . मागील वर्षी पोलीस चौकी जागेची मोजणी झाली. अधिकाऱ्यानी भेटी दिल्यात. मात्र अद्याप पर्यंत मेडशी पोलीस स्टेशनची निर्मिती न झाल्याने प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे .
मेडशी परिसर आदिवासी बहुल आहे .पोलीस चौकी अंतर्गत  मेडशी, रिधोरा, गोकसांगवी,कोलदरा , काळाकामठा,  उमरवाडी, वाकडवाडी, भामटवाडी, भौरद, भिलदुर्ग, वारंगी, पिंपळदरा आदी 12 गावाचा समावेश आहे  त्यापैकी वाकडवाडी,  भामटवाडी, कोलदरा ,काळाकामठा भौरद, भिलदुर्ग, उमरवाडी आदी आदिवासी बहुल गावे  आहेत .परिसरात गुन्हेगारी फोफावली आहे .25 हजार लोकसंख्याची जबाबदारी केवळ 4 पोलीस कर्मचाऱ्याच्या खांद्यावर आहे ..येथे 1  ए. एस .आय. , 1 जमादार, 2 पोलीस कर्मचारी आळीपाळीने कर्तव्य बजावत आहेत. एखादी अनुचित घटना घडल्यास येथील पोलीस बळ तोकडे पडत असल्याने  चक्क पोलीस चौकीतच दोन राजकीय गटात राडा होऊन चाकु तलवारी चालल्याचा  इतिहास आहे .येथील गुन्हेगारीचा आलेख चढता आहे .काही वर्षापूर्वी दुहेरी हत्याकांड राज्यभर गाजले. खून ,चोऱ्या ,दंगली बलात्कार, विनयभंग चिडीमारी अशा अनेक घटना येथे  घडल्या आहेत. पोलीस कर्मचाऱ्या वर अतिरिक्त कामाचा ताण असल्याने  काही  गुन्ह्याच्या तपास कामात  पोलिसांना अपयश येत आहे .मेडशी गाव अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. लेडी सिंगम  पोलीस  अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी   लक्ष  घालून मेडशी पोलीस स्टेशन निर्मितीच्या कामाला गती दयावी  अशी जनतेची मागणी आहे

विनोद तायडे वाशिम
8888277765

माहेश्वरी संघटनेच्या ‘संघटन आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिसाद

माहेश्वरी संघटनेच्या ‘संघटन आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिसाद

विनोद तायडे वाशिम

वाशिम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेच्या वतीने जिल्हयात 9 व 10 सप्टेंबर रोजी विदर्भ अध्यक्ष मदनलाल मालपाणी, उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक भंडारी, जिल्हाध्यक्ष शेखर बंग यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात संघटन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येवून संपुर्ण जिल्हयातील सहाही तालुक्यात पदाधिकार्‍यांनी संपर्क अभियान राबवून माहेेश्वरी समाजबांधवांना मार्गदर्शन, आर्थिक सर्वेक्षण व समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेकडून देण्यात येत असलेल्या सहाय्याबाबत माहिती दिली. धनज बु. येथील आपादग्रस्त आत्माराम सोमाणी यांच्या परिवाराला 40 हजार रुपये तर मंगरुळपीर येथील केशव गोरक्षण संस्थेला 21 हजार रुपयाची आर्थिक सहायता संंघटनेच्या वतीने देण्यात आली. स्थानिक शांतीनिकेतन येथे आयोजीत बैठकीला विदर्भ अध्यक्ष मदनलाल मालपाणी, अ‍ॅड. भंडारी, जिल्हाध्यक्ष शेखर बंग, सचिव शिवलाल भुतडा, कैलास मुंदडा, राजकुमार मुंदडा, भगवानदास दागडीया, जमनादास बाहेती, मुकेश चरखा, डॉ. हरिष बाहेती, श्रीराम राठी, सुनिल गट्टाणी, जिल्हा संघटक निलेश सोमाणी, धोंडूराम तोष्णीवाल, तालुका अध्यक्ष सचिन करवा, सचिव मनिष मंत्री, कैलास मुंदडा, डॉ. अशोक बंग, आशिष लढ्ढा, अनिल तापडीया, चरखा, तिलक बियाणी, दिपक लाहोटी, प्रा. अनिल बजाज आदींची उपस्थिती होती. 9 सप्टेंबर रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात ठिकठिकाणी संघटन पदाधिकार्‍यांनी जावून समाजबांधवांशी चर्चा केली तर 10 सप्टेंबर रोजी वाशीम, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा तालुक्यात संपर्क अभियान राबविण्यात आले. अनसिंग येथे बालाजी मंदिरात बैठकीचे आयोजन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप बजाज यांनी केले होते. मानोरा येथे बैठकीला उद्योजक राधेशाम हेडा, गोपाल लाहोटी समवेत समाजबांधव उपस्थित होते. मंगरुळपीर येथे आयोजीत बैठकीत केशव गोरक्षण संस्थेच्या वतीने नरेंद्र बजाज, संतोष बियाणी, नंदलाल जाखोटीया यांनी 21 हजाराचा धनादेश स्विकारला. धनज येथे समाजसेवी रुपेश बाहेती यांच्या पुढाकाराने आयोजीत बैठकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालाजी मंदिरात पार पडलेल्या बैठकीत धनज बु. येथील वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाकरीता वास्तुशांतीची रक्कम दिड लाख रुपये गावाला देणारे रुपेश बाहेती व शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे 16 हजार रुपये रक्कम देणारे निलेश सोमाणी यांचा विदर्भ अध्यक्ष मदनलाल मालपाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मालपाणी यांनी समाजात संघटन असणे जरुरी असून संघटन शक्तीव्दारे विविध समस्येचे निराकरण होवू शकते. समाजाने दुर्बल आर्थिक घटकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. सोबतच ठिकठिकाणी समाजबांधवांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देवून त्यांचे समााधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शेखर बंग, संचालन कैलास मुंदडा तर आभार निलेश सोमाणी यांनी केले.

विनोद  तायडे वाशिम
8888277765

मोठे ध्येय ठेवतांना पावले जमिनीवरचे ठेवा- अलका कुबल

मोठे ध्येय ठेवतांना पावले जमिनीवरचे ठेवा- अलका  कुबल



विनोद तायडे 
वाशिम

तुम्ही तुमचे शिक्षण  आणि  लग्न, प्रपंच संसार पूर्ण तर करालच. पण ते करतांना  मोठे ध्येय डोळयासमोर ठेवा ध्येय मिळत असतांनाच आपले भान कायम ठेवून आपली पावले जमिनीवरच असू द्या, असा संदेश सिने चित्रपट सृष्टीतील सर्व माहेरवाशीणींच्या  मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री अलका  कुबल यांनी विद्यार्थीनींना दिला.   डॉ. तात्याराव लहाने -अंगार  व  येणाऱ्या चित्रपटाच्या प्रोमोजसाठी त्या मां गंगा मेमोरिअल बाहेती हॉस्पीटल वाशीम येथे बोलत होत्या. यावेळी मंचावर निर्माता, दिग्दर्शक मधुमालती वानखडे,समाजसेवक मारशेटवार,डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती, सरस्वती समाज महाविद्यालयाच्या प्रा. राठोड मॅडम यांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले. सौ. अलका  कुबल यांचे स्वागत डॉ. सौ. सरोज बाहेती यांनी केेले तर निर्माता, दिग्दर्शक विराग मधुमातली यांचे स्वागत डॉ. हरिष बाहेती यांनी केले.

 आपल्या सहज सुंदर संवादातून अलका  कुबल यांनी  आपल्या आयुष्याचा पट रसिकांसमोर मांडला. मी आजपर्यंत अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत. माहेरची साडी येण्या पूर्वी 30 चित्रपटात माझ्या भूमिका झाल्या होत्या. यश मिळायला उशिर लागला.  म्हणून खचली नाही. नित्य नविन प्रयत्न करीत राहिले. 1991 मधील माहेरच्या साडीने मला रसिक प्रेक्षकांनी भरभरून आशीर्वाद दिला. तरी मी साधीच राहिले. यश डोक्यात शिरू दिले नाही. त्यामुळे फक्त प्रयत्नच करत राहिले तेच करत राहणे योग्य असते. यशाची हवा डोक्यात गेल्याने आज उध्वस्त झालेले अनेक कलाकार मी बघितले आहेत, असे होवू देवू नका. पाय जमिनीवरच असु द्या असे मनोगत अलकाताई कुबल यांनी व्यक्त केले.

आपल्या कल्पनांमध्ये निर्मीतीची शक्ती  असते. ती कल्पना प्रथम मनात आणा आणि ती पूर्ण करून वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा असो संदशे विराग मधुमालती वानखडे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या मनोगतातून दिला. डॉ. तात्याराव लहाने ह्या अत्यंत सामान्य परिस्थीतीत आयुष्य गेलेल्या  व्यक्तीने केवळ स्वत:च्या जिद्‌द आणि ज्ञानाच्या आधारावर समाजसेवेत आदर्श घालून दिला. या व्यक्तीचे आयुष्य जर सामान्य जनतेसमोर आले तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल ह्या भावनेने मी ही चित्रपट निर्मीती करीत आहे. ज्या डॉ. लहाने सरांनी अनेकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून अनेकांना दृष्टी दिली ह्याच ध्येयानुसार ह्या चित्रपटाच्या प्राप्तीतून वैयक्तीक खर्च न करता त्यामधून दोन नेत्र शस्त्रक्रिया रूग्णालयाची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. अशा चित्रपटातून आपल्या सर्वांना निश्चित प्रेरणा मिळेल असे सांगून त्यांनी 6 ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट आपण जरूर जरूर चित्रपटगृहात जावून बघावा असे आवाहन केले. ह्या चित्रपटामध्ये रिले सिंगिंगचा प्रथम उपयोग करण्यात आला. 108 शब्दांचे  गीत 300 कलाकारांनी-गायकांनी सुरात म्हणणे हा विश्वविक्रम म्हणून नमूद झाला हेही त्यांनी सांगीतले.

 यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. हरिष बाहेती यांनी सांगीतले की, आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिक्षणाने वाशीम परिसरात जनजागृती तर होतेच परंतू समाजसेवेत संस्कार सुध्दा  रूजविल्या जातात. त्यामुळे आमच्या संस्थाना अशा कार्याची माध्यमातून दाखविल्या  जाणारा चित्रपट  डॉ. तात्या लहाने-अंगार निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे सांगीतले. कार्यक्रमाला डॉ. प्रा. उल्हे मॅडम, प्रा. गजानन वाघ, डॉ. प्रा. शुभांगी दामले, डॉ.सौ. संगीता बाहेती, आरोग्य सेवक वर्ग तसेच शहरातील बहुसंख्य नागरिक व मॉ गंगा नर्सिंग स्कुलच्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

विनोद तायडे वाशिम
8888277765

जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. अरुण ए. राऊत रुजू

जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ. अरुण ए. राऊत रुजू  

विनोद तायडे
वाशिम
वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर डॉ. अरुण ए. राऊत हे आज रुजू झाले. डॉ. एन. बी. पटेल हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. भुलतज्ञ डॉ. अनिल कावरखे, डॉ. जांभरूणकर, डॉ. धोत्रे, नेत्रतज्ञ डॉ. बाहेकर, डॉ. लोणकर, डॉ. अवचार यांनी यावेळी डॉ. राऊत यांचे स्वागत केले.

रुग्णसेवेची जबाबदारी व गुणवत्तापूर्ण सेवा, प्रेरणा प्रकल्प, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, नवजात शिशुना गुणवत्तापूर्ण सेवा, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम व मा. पंतप्रधान यांच्या प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला एएनसी तपासणी व लसीकरण, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक, अधिकारी व कर्मचारी यांचे हक्क व कर्तव्यांची जपणूक करण्याबाबत विशेष भर देणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

विनोद तायडे वाशिम
8888277765

शिवसेनेचा कर्ज मुक्ती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

शिवसेनेचा कर्जमुक्ती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला



विनोद तायडे वाशिम

शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आल होते . त्यानुसार वाशीम जिल्हयात विदर्भ संपर्क नेते तथा परिवहन मंत्री मा. दिवाकरजी रावते साहेब यांच्या आदेशानुसार 11 सप्टेंबर  ला दुपारी छत्रपती शिवाजी चौकातून शिवसेनेचा कर्जमुक्ती मोर्चास प्रारंभ झाला  . हजारोच्या संख्येने  मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला .यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले .
  शेतकर्‍यांना दसर्‍यापुर्वी कर्जमुक्त करण्यात यावे, मुग, उडीद, सोयाबीन ही पिके अल्पपावसामुळे नष्ट झाली असून या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, पिकविमा व कर्जमुक्तीची अर्जाची तारीख वाढवून देण्यात यावी, पिकविम्याचे ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात आले परंतु रक्कम भरुन घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिला असल्यामुळे पिकविम्याचे अर्ज आँफलाईन भरुन रक्कम भरुन घेण्यात यावी, शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरतेवेळी शेतकर्‍यांचे अंगठे जुळत नसल्यामुळे बरेच अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळेच शेतकर्‍यांचे अर्ज ऑफलाईन भरुन घेण्यात यावे. कर्जाचे पुनर्गठन अद्याप करण्यात आलेले नसून त्यासंबंधीचे आदेश संबंधीतांना तात्काळ देण्यात यावे आदी मागण्यार्थ  नेतृत्व खासदार भावनाताई गवळी व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील  यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला  मोर्चा छत्रपती शिवाजी चौक, पाटणी चौक, अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयवर धडकला  . मोर्चात जिल्हयातील शेतकरी बांधवांसह शिवसेनेचे कार्यकर्ते हजारोच्या   संख्येने  सहभागी झाले  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, चंद्रशेखर देशमुख, भागवत गवळी, दिनेश राठोड, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, महादेव ठाकरे, संतोष सुरडकर, अनिल पाटील राऊत, रवि पवार, नरहरी कडू, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, अरुण मगर, संतोष जोशी, विवेक नाकाडे, राजु देशमुख, गणेश बाबरे आदीसह हजारो  शिवसैनिक व  शेतकरी सहभागी झाले .

,विनोद तायडे वाशिम
8888277765

रिसोड तहसिलवर लोककलावंताचा विशाल मोर्चा धडकला

   रिसोड तहसिलवर लोककलावंताचा विशाल मोर्चा धडकला


विनोद तायडे

विदर्भ लोककला मंच नागपूर च्या वतीने आयोजित लोक कलावंतांच्या  विविध मागण्यार्थ  धडक भव्य मोर्चा विदर्भ नेते दत्तराव  धांडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यालयावर धडकला .यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
लोककलावंतावर नेहमीच अन्याय होत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे लोककला लोप पावण्याच्या मार्गावर आहे. लोक कलेतील अनेक प्रकार आजही देशात आपले अस्तित्व टिकवून आहे. सरकार मात्र उदासीन असल्याने विदर्भ नेते दत्तराव धांडे यांची लोककलावंतांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे .याचं महिन्यात वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर लोक कलावंताचा ऐतिहासिक  मोर्चा धडकला होता .त्याच धर्तीवर रिसोड येथे विशाल मोर्चा ची सुरुवात संत अमरदास बाबा मंदिरापासून करण्यात आली .मोर्चामध्ये सर्वच समाजाचे  कलावंत  पारपपारीक वेशभूषेत  सहभागी झाले .मोर्चा मध्ये लोक कलावंतांनी आपली कला सादर केली.  तहसिलदार यांना  विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . कृषी उत्पन्न बाजार समिती येथे  लोक कलावंतांना भव्य मेळावा घेण्यात . यावेळी मान्यवरांची भाषणे झालीत .
 मोर्चात वाशिम व बुलढाणा जिल्हयातील हजारो लोक कलावंत सहभागी झालेत


विनोद तायडे वाशिम
8888277765
गौरी यांच्या हत्येचा गंगापूर येथे अखिल भारतीय  मराठी पत्रकार संघाकडुन  जाहीर निषेध

गंगापुर (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येनं संपूर्ण कर्नाटक राज्यच नव्हे तर पत्रकारिता क्षेत्र  हादरून गेलं आहे. या घटनेचा अखिल भारतीय  मराठी पत्रकार संघ. गंगापुर तालुका. यांनी तहसिलदार चंद्रकात शेळके यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आले हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी  मराठी पत्रकार  संघाचे अध्यक्ष लालखाँ पठान यांनी  केली आहे. यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार श्रीराम ठोंबरे म्हणाले की पञकारिता करणे किती जिकिरीचे बनले आहेत ते प्रसंग जिवावर देखील बेतु शकते यांचे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील गौरी लंकेश यांच्या झालेल्या निर्धुन हत्या मुळे शासनाने पञकार संरक्षण कायदा त्वरित अंमलात आणावा व गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ पत्रकार श्रीराम ठोंबरे यांनी केले आहेत

कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांना गोळ्या झाडुन क्रुरतेने हत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारे हत्या करून वास्तव दाबण्याचा प्रयत्न हल्लेखोरांचा दिसतो. या घटनेमागील वास्तव समोर येणे गरजेचे आहे. विचाराचा लढा विचारानेच हवा रक्तपाताने नव्हे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व या हल्ल्यामागे खरे सुत्रधार कोण आहेत हे समोर यावेत. यासाठी शासनाने कठोर भुमिका घ्यावी अन्यथा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ लोकशाही पध्दतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा ही अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष लालखाँ पठान यांनी तहसिलदार चंद्रकात शेळके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार श्रीराम ठोंबरे उत्तमराव केदारे बबनराव जगताप धनंजय ठोबंरे सदाशिव जंगम शहर अध्यक्ष हरुन पठान अनवर बागवान रमेश ठोंबरे बाळासाहेब लोणे मकसुद खाँन लोधी विनोद जाधव कदिर शेख प्रमोद जाधव राजू जाधव सोमनाथ शिंदे

आदि  पञकार यांनी तीव्र स्वरूपात घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

तीन लाख पस्तीस हजारांच्या ९ दुचाकी जप्त

तीन लाख पस्तीस हजारांच्या ९ दुचाकी जप्त

जालना, दि. 11 : जालना, परभणी व औरंगाबाद या तीन जिल्ह्यात  दुचाकी चोरून पोलिसांसमोर आव्हान उभे केलेल्या चोरास पकडण्यास अखेर यश आले. तिन्ही जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून लांबविलेल्या नऊ मोटारसायकलींसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी हि कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्ञानेश्वर नारायण सोळंके (२८, रा. गोंदी,ता.अंबड) हा सराईत दुचाकीचोर अंबड चौफुली परिसरात असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौर यांना रविवारी सकाळी लागला. त्यांनी तात्काळ पथकासह तेथे जात  त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून चोरीच्या ९ दुचाकी  जप्त करण्यात आल्या.

अधिक चौकशी केली असता,  आरोपीने परभणी जिल्ह्यातील पाथरी, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड व जालना येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. हि कारवाई  जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, चैनसिंग गुसिंगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख रज्जाक, दिलीपसिंग ठाकूर, नारायण करनाडे, विश्वनाथ भिसे, पोहेकॉ. सुरेश गिते, भालचंद्र गिरी, प्रशांत देशमुख, समाधान तेलंग्रे, राहुल काकरवाल, सोमीनाथ उबाळे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

शंकरासारख्या माणसामुळे प्रमाणिकपणा जिवंत : विजयराव जाधव

शंकरासारख्या माणसामुळे प्रमाणिकपणा जिवंत : विजयराव जाधव


ग्राहकाची सोन्याची पोथ केली परत


नंदकिशोर वनस्कर

मालेगाव शहरातील सायकल दुरूस्तीचे काम करणार्या शंकर सुडके यांनी ग्राहकाच्या न कळत त्यांच्या दुकानात पडलेली सोन्याची पोथ त्या ग्रहकाच्या घरी जावुन परत केल्याने शंकर सुडके यांचा प्रमाणिकपणा दिसुन आला.

मालेगाव शहरातील शंकर सुडके  यांचे जुने बस स्थानक परिसरात अनेक वर्षापासुन जयभोले सायकल स्टोअर्स नावाने सायकल दुरूस्तीचे दुकान आहे. या दुकानात दिवसभर काम करून आपल्या कुंटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मालेगाव तालुक्यात नाही तर वाशीम जिल्हात प्रसिध्द सायकल दुरूस्तीचे दुकान आहे. शंकर सुडके यांचा सायकल दुरूस्तीचा व्यवसाय वडिलोपार्जीत असल्याने ते सुध्दा हा व्यवसाय करत आहेत. गुरूवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या दुकानावर आपल्या सायकलचे पंचर काढण्यासाठी आले. पंचरचे पैसे काढतांना त्याच्या खिशातुन एका पुडीत बंद असलेली अंदाजे पंधरा हजार रूपये किंमतीची सोन्याची पोथ त्यांच्या न कळत पडली व ते ग्राहक तेथुन निंघुन गेले. मात्र आपल्या कामात व्यस्त असलेले शंकर सुडके यांचे लक्ष त्याकडे गेले व पाहले तर त्यात सोन्याची पोथ होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या ग्राहकाचा शोध घेवुन ति पोथ त्या ग्रहकास परत केली. अशाप्रकारे शंकर सुडके यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय दिला. या प्रामाणिकपणाबद्दल शंकर सुडके यांचा माजी आमदार विजयराव जाधव याच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन भाजपाच्यावतीने त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी बालतांना माजी आमदार विजयराव जाधव म्हणाले की, शंकर सुडके यांनी त्या ग्राहकाची सोन्याची पोथ परत करून माणसामध्ये प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवुन दिले.

शंकर सुडके यांच्या आजच्या प्रकारामुळे त्यांचे वडिल स्व. भगवानराव सुडके यांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार दिसुन आले. त्यांनी केलेल्या संस्कारामुळेच शंकर सुडके यांनी त्या ग्राहकाची पडलेल्या सोन्याची पोथ क्षणाचाही विलंब न लावता कोणत्याही प्रकारचा मोह न करता परत दिली. आजच्या युगात शंकर सुडके माणसामुळे प्रमाणिकपणा जिवंत आहे. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष तानाजी पवार, जिप सदस्य शंकरराव बोरकर, जिल्हा सरचिटणीस संदीप पिंपळकर, तालुका सरचिटणीस दिपक आसरकर, मालेगाव नगर पंचायतचे भाजपाचे नगरसेवक किशोर महाकाळ, बाबुराव जाधव, प्रा.आनंद देवळे, वसंतराव घुगे, कैलासराव घुगे, किरण चांगाडे, संजय केकन, मणोज काबरा, विश्वासराव बोरकर, भाजपा युवा मोर्चाचे मालेगाव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काटेकर, उपाध्यक्ष नंदु यादव सह आदी कार्यकर्तांची उपस्थिती होती.

यवतमाळचे शिवदत्ताचे तांडव"-"लोकप्रतिनिधी-कंत्राटदार-अधिकारी"यांचा राजरोसपणे सुरु असलेला गोरखधंदा बंद कोण करणार -किशोर तिवारी


यवतमाळचे शिवदत्ताचे तांडव"-"लोकप्रतिनिधी-कंत्राटदार-अधिकारी"यांचा राजरोसपणे सुरु असलेला  गोरखधंदा बंद कोण करणार -किशोर तिवारी


विनोद तायडे वाशिम

सध्या अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या चर्चेत असलेल्या यवतमाळ येथील कंत्राटदार शिवदत्त शर्मा  यांची माझा मुलगा अपघाताने मागील सहा महीन्यापासून कोमात आहे मी सरकारी दरापेक्षा २५ टक्के दरात काम घेतले असल्यामुळें माझे घर विकुन आपणास कामाच्या रकमेच्या ५ टक्के विधानसभा क्षेत्र आमदाराची अलीखीत  जबरीची खंडणी जी अधिकृतपणे अधिकारी गोळा करतात ती देण्यास असमर्थ आहे ही ध्वनीफीतने  "लोकप्रतिनिधी-कंत्राटदार-अधिकारी"यांचा राजरोसपणे सुरु असलेला  गोरखधंदा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला  आहे सगळ्या राष्ट्रीय व  राज्य स्तरावरच्या माध्यमांनी मागील चार दिवसापासुन सतत कंत्राटदार शिवदत्ता शर्मांचे आमदारांशी झालेले स्वछता अभियानावर झालेले पवित्र संभाषण जगासमोर आनल्यानंतर या गंभीर आरोपांची साधी चौकशीची मागणीही विरोधीपक्ष वा  सत्ताधारी विरोधी पक्ष(ही जमात मागील ३ वर्षात जन्माला आली आहे ) करीत नाही यावरूनच सारेच्या सारे या देशलुटीच्या राष्ट्रीय पर्वात सहभागी असल्याची चर्चा वचिंत दलीत जनता करीत असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढावा अशी विनंती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांनी केली आहे .

दवाखान्यात डॉक्टर नाहीत ,प्रशासनात अधिकारी नाहीत ,शेतकरी मरत असतांना कृषी व ग्रामीण   विभागात अधिकारी नाही अशावेळी नेमका ठाणेदारच पाहीजे यासाठी  आपली सारी पत खर्ची लावणाऱ्या नेत्यांनी शिवदत्त शर्मा यांचे सत्यासाठी सुरू असलेले तांडव एक गंभीर इशारा असुन सत्ता -संपत्ती -सन्मान अनित्य आहेत एक दीवस जाणारच मात्र त्याचा खुला दुरुपयोग समाज माफ करीत नाही असा निर्वाणीचा सल्ला किशोर तिवारी यांनी पोटभरू नेत्यांना दीला आहे .

 लोक चांगले दिवस येण्यासाठी व शेतकरी शेत मजुर आदीवासी दलीत यांच्या घरात सुखींचे दिवस येणार या आशेने सरकारे बदलतात मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे समाजसेवक व राजकीय नेते चांगले दिवस येऊ देत नाहीत . भ्रष्ट व नालायक अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देशच विकण्याचा धंदा सुरु केला असुन आता जनतेनी  हातात मशाली घेण्याची वेळ आली असल्याची भावना तिवारी यांनी या संघटीत  गोऱ्रखंधंद्यावर टीका करतांना म्हटले  आहे .



मागील महिन्यातच असाच गोऱ्रखंधंद्यावर प्रकाश टाकतांना समोर आलेल्या सत्याप्रमाणे  राज्यात कार्यरत असलेल्या मजुरांच्या  सहकारी संस्था ह्या मजुरांच्या नसुन राजकीय नेत्यांच्या पोट भरण्याचा धंदा असल्याचे सबळ पुरावे व सत्य  अनेक जिल्ह्यातील तथाकथीत मजूर संस्थाचे  सहकार खात्याने ऑडीट केल्यावर ह्या मध्ये असलेले मजुर सध्या आयकराचा भरणा करणारे राजकीय नेते असुन त्यांनी संस्थांनी केलेल्या कामावर एक दिवसही काम केल्याचे समोर आले आहे तसेच जे काम खुल्या  निविदामार्फत फक्त ७० टक्के  निर्धारीत निधीमध्ये सहज होत असतांना संस्थामार्फत हेंच काम १०० टक्के निर्धारीत निधीमध्ये करण्यात आले असुन यामध्ये कोणतीच खुली  स्पर्धा नसल्याचे स्पष्ट झाले असुन ही एक संघटीत कट रचुन अधिकारी यांच्या सहमतीने केलेला  गुन्हा असल्यामुळे   या गोरखधंद्यामध्ये शामील असलेल्या सर्व संस्थामालकांवर  फौजदारी करण्याच्या व सरकारी निधी वसुल करण्याचा आग्रह  किशोर तिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकेला  सर्व पुराव्यानिशी  तक्रार सादर केल्यानंतर केला होता .


                              महाराष्ट्रात जिल्याजिल्ह्यात नेत्यांनी व कंत्राटदारांनी तथाकथित मजूरसंस्था निर्माणकरुन त्यांचा एक थोतांड महासंघ निर्माण केला व आपले समांतर सरकार स्थापन करून राजरोसपणे गोरखधंदा करून सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा जुना लावत असुन खासदार ,मंत्री, आमदार हे सुद्धा ह्या समांतर सरकारला दंडवत लाऊन आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम मागत असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात येत होत्या . मजूरसंस्थाचे नेते मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी -काँग्रेस पदाधिकारी होते आता भाजप -शिवसेनेचे पदाधिकारी झाले असुन सरकारी अधिकाऱ्यांवर दबाब टाकुन सरकारी तिजोरीची कोट्यवधी खुली लुट करीत असुन यामध्ये हळुहळु न्याय व्यवस्था सोडुन लोकशाहीचे सारे स्तंभ शामील होत असल्याची वेदना  किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे जवळ व्यक्त केली होती .

विनोद तायडे वाशिम
8888277765

आधुनिक शेती व उद्योगातून साधला जातो आर्थिक विकास - गोविंद डाके


आधुनिक शेती व उद्योगातून साधला जातो आर्थिक विकास - गोविंद डाके

  विनोद तायडे  वाशिम प्रतिनिधी

वाशीम - आज छोट्या छोट्या बाबींमधूनही आपण पैसे कमावू शकतो. मात्र त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेती व उद्योगात केला तर त्यातून आपला आर्थिक विकास साधला जाते. लघुउद्योजकांनी या तंत्रज्ञानाचा आपल्या उद्योग व शेतीउद्योगामध्ये उपयोग करावा असे मत अखिल भारतीय माळी महासंघ उद्योजक आघाडीचे राज्य अध्यक्ष गोविंद सुमन केशव डाके यांनी केले.
    स्थानिक लाखाळा येथील महात्मा फुले लॉनमध्ये 9 सप्टेंबर रोजी उद्योजक व्यवसायीकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालरोग तज्ञ डॉ. विजय कानडे हे होते. तर मंचावर उद्योजक अनिल केंदळे, सत्यशोधक विचारवंत डॉ. रवी जाधव, अ.भा. माळी महासंघाचे मार्गदर्शक श्रीकृष्ण बोळे, विशाल इंगोले, आनंदराव पिंजरकर, अकोला अर्बनचे संचालक प्रकाश भांदुर्गे, अ‍ॅड. गवळी, वानखेडे, सौ. मिना बगाडे यांची उपस्थिती होती.
    प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने डाके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाके यांनी विविध उद्योगाची सखोल माहिती दिली. ते म्हणाले की, आपण शेती करतो त्या शेतीमध्ये कोणतीही वस्तु वाया जात नाही. सर्व वस्तु विकल्या जातात. शेती आधुनिक पध्दतीने व प्रयोगात्मकरित्या वापर करुन केली तर त्यातून आपण निश्चितपणे आपला आर्थिक विकास साधू शकतो. अनेक शेतकरी सोयाबीन पेरतांना जवळजवळ झाडे पेरतात. त्यामुळे पिक कमी येते. त्यामुळे प्रत्येक सोयाबीनच्या झाडात किमान 9 इंचाचा फरक ठेवल्यास आधी येणार्‍या 15 टक्के पिकापेक्षा 75 टक्के पिक जास्त येते. सांबाराची शेती करतांना दररोज एक ओळ पेरुन त्याला पाण्याचे भिजवन न देता केवळ पाण्याची फवारणी जरी केली तरी तुमचे पिक मुबलक येते. आपण फुले दुरुन दुरुन आणतो त्यापेक्षा अर्ध्या एकरामध्ये मी सांगीतले तशी फुलांची झाडे लावली तर आधी दहा रुपये किमत असणार्‍या फुलांची पन्नास रुपयाने बाहेरगावात फुले विकल्या जातात. बरेच लोकांना माहित नसेल की वाशीममधून सर्वात जास्त डाळींबाची पिके बाहेरगावात निर्यात केली जातात. महिलांनाही यशस्वी उद्योजक होता येते. त्यासाठी महिलांनी आपले घरकाम आटोपून कुरड्या, पापड तयार करुन मला पाठवावे. मी त्याचा जास्तीत जास्त भाव देईल. सलग तीन तास डाके यांनी उसंत न खाता महिला व पुरुषांना विविध उदाहरणे देवून उद्योगांची माहिती देवून आपली उर्जा इतर कामात खर्ची न घालता उद्योगधंद्यात घालावी असे आवाहन करत नवउद्योजकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
    यावेळी डाके यांनी राज्य संघटीकासौ. किरण गिर्‍हे, जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, महिला अध्यक्ष सौ. पूजा उलेमाले, उपाध्यक्ष सुनील जाधव, प्रशांत भडके, अमर जाधव, सचिव रूपेश भोसले, देवा वानखेडे, राज्य सदस्य नागेश काळे, शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, डॉ. प्रमुख पावसे, गोलू इंगोले, योगेश उलेमाले, मंकेश माळी, नथ्थुजी राऊत, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त अनिल धुळे, राष्ट्रीय खेळाडू नारायण ठेंगडे, उद्योजक वैभव उलेमाले यांच्या कार्याचे कौतुक केले. समाधान गिर्‍हे यांनी डाके यांना संविधान पुस्तिका भेट दिली.
    कार्यक्रमाचे संचलन सौ. किरण गिर्‍हे यांनी तर आभार नारायणी कलेक्शनचे मालक योगेश उलेमाले यांनी मानले. कार्यक्रमाला शिवसेना नेते गजानन जोगदंड, उमेश मोहळे, नंदू उलेमाले, श्रीराम हजारे, तालुकाध्यक्ष वैभव इंगोलकर, अधिकारी प्रमुख पंकज उलेमाले, उद्योजक अतुल इंगोले, तालुकाध्यक्ष अशोक राऊत, गणेश गाभणे, प्रभाकर वानखेडे, प्रवीण उलेमाले, गजानन राऊत, रवि इंगोले, संभाजी साळसुन्दर, सत्यशोधक जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, उद्योजक गोपाल जाधव, संदीप वानखेडे, मदन पिंजरकर, अमोल सुरुसे, संतोष वानखेडे, विशाल भांदुर्गे, राजु इंगळे, दिलीप जाधव, संतोष इंगोले, जेष्ठ पत्रकार मंगल इंगोले, देवानंद खडसे, संतोष गडेकर, सचिव सौ. रेखा राऊत, सौ. छाया भांदुर्गे, सौ. मेघाताई इंगळे, सौ. मडके, सौ. रेणुका भांदुर्गे, सौ. अनीता इंगोले, सौ. अलका धामणकर, सौ. अलका गिर्‍हे, सौ. विणा पिंपळकर या सह माळी युवा मंच, माळी कर्मचारी सेवा मंडळ, सावित्री महिला मंचचे सर्व पदाधिकारी, अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

विनोद तायडे वाशिम
8888277765

शहापूर येथे पाच वर्षांपासून धूर फवारणी नाही




शहापूर येथे पाच वर्षांपासून धूर फवारणी नाही 



फुलचंद भगत-प्रतिनिधी मंगरुळपीर

मच्छरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

गजानन मोरे यांची धूर फवारणीची मागणी

मंगरुळपीर- शहरालगत असलेल्या शहापूर व नवीन सोनखासमध्ये गेली पाच वर्षापासून ग्रामपंचायतने धूर फवारणी केली नसल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य पुर्णता धोक्यात आले.या भागात तात्काळ धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन मोरे यांनी केली आहे. शहापूर व नवीन सोनखासमध्ये लोकवस्ती दाट असून या भागातील विविध ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्याकरिता पुरेश्या नाल्याची व्यवस्था नसल्यामुळे हे सांडपाणी ग्रामस्थांच्या घरासमोर साचते. यातून परिसर दुर्गंधीमय झाला तसेच गांजरगवत वाढल्याने मच्छराची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच या परिसरात डुकरांचा संचार वाढला आहे या विविध समस्यांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतने तात्काळ दखल घेवून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

फुलचंद भगत,मंगरुळपीर जि.वाशिम
मो.9763007835

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

मेडशी ग्रामपंचायत पडद्या मागील षडयंत्र


जिल्हा परिषद सदस्याची कुरघोडी


विनोद तायडे 
घाणीत होत असलेली अन्न विक्री
वाशीम - मेडशी ग्राम पंचायत मालेगाव तालुक्यातील मोठी समजली जाणारी ग्राम पंचायत आहे . सद्यःस्थितीला ग्रामपंचायत चा रिमोट कंट्रोल हरविल्याने कारभार अनियंत्रित झाला आहे. गावात नाल्या, रस्ते  पाणी,विद्युत पथदिवे, शिक्षण, आरोग्य घरकुल, शौचालय,  आठवडी बाजार मूलभूत सुखसुविधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे  . जिल्ह्याचे
ग्रामपंचायत समोर साचलेले पाणी.
 मिनिमंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतला कित्येक वर्षासपासून नामफलक नाही  लोखंडी गेट  ची मोडतोड झाली आहे .कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत चे शौचालय बंद अवस्थेत असल्याने गाव हागणदरी मुक्ती चा संदेश तरी  कसा देणार ? हा एक प्रश्न आहे . ग्रामपंचायत प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगल्या गेली आहेत .ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राज्य मंत्री बाबासाहेब सरनाईक यांच्या हस्ते 1973 मध्ये झाले. ग्रामपंचायत भवनांची दुरवस्था झाली आहे ग्रामपंचायतच्या दुरुस्तीच्या नावाखाली   कित्येक वेळा बिले काढण्यात आले मात्र तो निधी कोणाच्या घशात गेला हा संशोधनाचा विषय  आहे  2015 मध्येही ग्रामपंचायत दुरुस्ती आणि शौचालय दुरुस्तीच्या नावाखाली अनेक नियमबाह्य कामे करण्यात आली .मीडियाने हा प्रकार उघड केल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले .राजकीय नेते मात्र नामानिराळे राहले बळी गेला तो ग्रामविकास अधिकाऱ्याचा ! मध्यंतरी काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या सत्तेत राहण्यासाठी किंगमेकर लाच  आव्हान देण्यात आले काही सदस्यनी बंड पुकारले वेगळी चूल मांडली आणि चूल पेटलीही. राजकीय नाट्यमय घडामोडी च्या पडद्या मागील सुत्रधार एक जिल्हा परिषद सदस्य असल्याचे वेगळी सांगण्याची गरज नाही . जिल्हा परिषद सदस्यांचा  हेतू साध्य झाल्याने  त्याला मेडशी गावात  विकासकामे टाकणे शक्य झाले अन्यथा त्याला मेडशी गावात 5 वर्षही कामे टाकणे शक्य झाले नसते. जिल्हा परिषद सदस्याला विकास कामावर कमिशसनपोटी करोडो रुपयांचा फायदा झाला  . जिल्हा परिषद सदस्य मेडशीच्या राजकीय सारिपाटावरील वझीर ठरला नको असलेले ठराव पारीत झाले  त्याने चक्क  गावातील नेतृत्वालाच आव्हान दिले . त्याने काही लाचार मानसिकतेच्या लोकांना हाताशी धरून स्वताची पाठ स्वताच थोपटून घेतली एकंदरीत नाट्यमय राजकीय घडामोडीत गाव नेत्याला शह बसला सद्यःस्थितीला सदस्यांची चूल पेटविणारा  रिमोट कंट्रोल हरविल्याने  ग्रामपंचायतचा कारभार अनियंत्रित झाला आहे . संपूर्ण गाव समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. नाली साफसफाई , आठवडी बाजार लिलावात  मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्याने गटविकास अधिकाऱ्याकडे करुनही चौकशी अहवाल गुलदस्यांत आहे .पाणी कुठे मुरले  हेच समजायला मार्ग नाही . जिल्हा परिषद सदस्यांने ग्रामपंचायत प्रशासनाला  हाताशी धरून  अनेक बोगस कामे केलीत. लाखो रुपये बिल काढल्याची तक्रार  माजी उपसरपंच मोहन राठोड यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली कार्यवाहि मात्र शून्य आहे . राज्यातील  सत्ताधारी  पक्षाच्या एका  जिल्हा परिषद सदस्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर करत नित्कृस्ट दर्जाच्या बांधकामाचे बिले काढली असल्याची चर्चा आहे . 10 ते 20 टक्के कमिशन पोटी  एका जिल्हा परिषद सदस्यांने मेडशी सर्कल मध्ये विकास कामाचा सपाटा  लावला. कॉलेटी कंट्रोल विभागाने कामाची तपासणी केल्यास  अनेक बोगस कामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे  मिनिमंत्रालयातील शिलेदाराची पंजे गैरव्यवहाराने बरबटली आहेत एकेकाळी दिल्ली दरबारी वजन ठेवून असणाऱ्या पुढाऱ्याचे वजन हलके झाल्याने   पुढारी अज्ञानावात गेले की काय अशी शंका निर्माण झाली आहे कमिशानखोर वृत्ती वाढीस लागली आहे .दोन वर्षापूर्वी १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेली नियमबाह्य कामाने ग्रामविकास अधिकाऱ्याचा बळी घेतला . तेव्हापासून गावाला ग्रहण लागले गावाचा विकास ठप्प झाला कर्तव्यदक्ष ग्रामसेवकावर येथे हल्ला झाल्याच्या बर्याच घटना घडल्या . कित्येक वर्षे कोणताही अधिकारी येथे येण्यास तयार नव्हता. मीडियाने ग्रामविकास अधिकारी नियुक्तीचा प्रश्न लावून धरल्याने सीईओ यांनी वृत्ताची दखल घेत  ग्रामविकास अधिकाऱ्या ची नियुक्ती केली मात्र नियुक्ती आदेश देऊनही  ग्रामविकास अधिकारी रुजू झालेच नाही .अखेर भारिप बहुजन महासंघाने ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याने या ठिकाणी ग्रामविकास अधिकारयाची नियुक्ती करण्यात आली.  कमिशन पोटी आठवडी बाजाराची दुरवस्था झाली आहे व्यापाऱ्याना बसण्यासाठी ओटे नाहीत ,पुलाची दुरवस्था झाली आहे.12 गावातील  बाजरहाटासाठी येणाऱ्या जनतेसाठी कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही मग वर्षोनूवर्ष बाजार लिलावातून  येणारे लाखो  रुपये जातात तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे
यावर्षी बाजार लिलाव 1 लाख 93 हजार 500 रुपयात करण्यात आला त्यापैशातून आठवडी बाजारात सुख सुविधा पुरविणे गरजेचे असताना तो पैसा कोणाच्या घशात घातला याचा उलगडा होणे महत्वचे आहे. व्यापाऱ्याना बसण्यास कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही ओट्याची दुरवस्था झाली आहे .सांडपाणी बाजारात सोडले जात असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य  पसरले  आहे. गावकऱ्याना बाजार करताना कसरत करावी लागत आहे. आठवडी बाजाराचा पूल जमीनदोस्त झाला असल्याने नाल्याचे पाणी साचून डबके तयार झाले आहे .डबक्यालगत मिठाईचे दुकाने  लावले जात असल्याने जनतेचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मेडशी गावाचा वाली कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे

विनोद तायडे वाशिम
8888277765