कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव द्वारा दत्तक ग्राम खानापूर (मोझर ) येथे रा.से.यो चे विशेष शिबीर.
कामरगाव : येथील कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव चे रा.से.यो. विशेष शिबिराचे आयोजन दत्तक ग्राम खानापूर (मोझर ) येथे दि. १३ ते २० जानेवारी या दरम्यान करण्यात आले.
या विशेष शिबिराचे उदघाटन १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अविनाश भडांगे अध्यक्ष चिंतामणी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तर उदघाटक मा. प्रा. डॉ. प्रदीपजी खेडकर अध्यक्ष शिक्षण मंत्र तथा सिनेट सदस्य , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, प्रमुख अतिथी मा. डॉ. जयंत कारमोरे , प्राचार्य स्व. मदनगोपाल मुंदडा महाविद्यालय चांदुर रेल्वे व प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उद्धव जाने सर, सरपंच सौ. छायाताई जामनिक उपसरपंच अंकुश कडू मुख्याध्यापक श्री. नानासाहेब मुंदे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती राहणार आहे.
शिबिरादरम्यान दररोज दुपारी विध्यार्थ्यांसाठी बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जानेवारी दु. ३ वाजता मा. प्रा. डॉ. जयंत कारमोरे यांचे बदलती शिक्षण पद्धतीमध्ये युवकांची भूमिका, १४ जानेवारी प्रा. डॉ. संतोष राठोड , युवा पिढी आणि मूल्य शिक्षण, १६ जानेवारी मा. श्री. श्रीकृष्ण पखाले राष्ट्रसंतांचे तत्वज्ञान व युवा पिढी, १७ जानेवारी मा. प्रा. राजेंद्र जाने एकात्मिक कीड :रोग्यव्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन , १८ जानेवारी प्रा. डॉ. अर्चनाताई देशपांडे , महिला सक्षमीकरण , १९ जानेवारी रोजी रक्तदान शिबीर ,रक्तगट तपासणी शिबीर , मोफत आरोग्य तपासणी शिबीर व बौद्धिक सत्रात डॉ. अनिल कविमंडन हे आरोग्यविषयक मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच विविध उपक्रमात ग्रामस्वच्छता , आरोग्य तपासणी , श्रमदान , जलव्यवस्थापन पर्यावरण जागृती हा आहे. रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दिनेश तट्टे व प्राध्यापक वर्ग यांच्या सहकार्याने या विशेष शिबिराचे समारोप २० जानेवारी रोजी ११ वाजता होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. प्रा. डॉ. संतोष ठाकरे गाडगे बाबा महाविद्यालय मुर्तिजापूर , मा. श्री. डॉ. यशवंतराव भडांगे , संचालक श्री. चिं. ब. शि. प्र. मं. अमरावती, मा.श्री. अमोल कडू माजी सरपंच खानापूर , मा. श्री. ज्ञानेश्वर निंघोट ग्राम सेवक खानापूर व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. उद्धव जाने कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव हे राहणार आहेत.
विशाल ठाकरे ८९७५७३४३३८
सम्राट टाइम.कामरगाव प्रतिनिधी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा