गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

नवनिर्वाचित सरपंचांची कार्यशाळा संपन्न



वाशिम दि. ११/१/१८
*हागणदारी मुक्तीचा दर्जा कायम टिकवून ठेवणं हे नविन सरपंचासमोर मोठं  आवाहन असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी केलं.* 
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  विठ्ठल वाडी येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित सरपंचांच्या एक दिवसीय कार्यशाळेत (दि.११)  बोलत होत्या. पुढे बोलतांना देशमुख म्हणाल्या कि गाव हागणदारीमुक्त करणे गेवढे अवघड होते पण आता तो दर्जा कायम ठेवणे हेही तीतकेच अवघड काम नविन सरपांचानी करावे. कारण त्याशिवाय यापुढे गावांना कोणताही निधी देणे शक्य होणार नाही असे त्या म्हणाल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे स्वच्छ भारत मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदान इस्कापे आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, आणि संजय मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गाव हगणदारीमुक्त करणा-या नाऱ्या सर्व लोकांचे मनपूर्वक अभिनंदन केले. आणि नवीन सरपंचांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
*मार्च 2018 पर्यंत जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा ध्येय असल्याचे सांगुण गणेश  पाटील म्हणाले की आतापर्यंत जिल्ह्यातील तीनशे ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. कारंजा तालुका मागील वर्षीच हागणदिरीमुक्त झाला असून येणार्‍या 26 जानेवारी रोजी मंगरूळपीर तालूका हागंदारी मुक्त घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. हागणदारी मुक्त झालेल्या गावांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनीही यावेळी आपले विचार मांडले. सरपंचाना प्रशिक्षण देणे गरजेचे असून त्यांना विविध योजनांची माहिती देण्यासोबतच तांत्रिक आणि प्रशासकीय ज्ञान देणे गरजेचे असल्याचे मत चंद्रकांत ठाकरे यांनी व्यक्त केले. चांगले काम करताना विरोध होतोच पण विरोधामुळे खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा असा सल्ला नवनिर्वाचित सरपंचांना त्यांनी दिला.
या कार्यशाळेत काही सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक  स्वरूपात सत्कार करण्यात आला.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनीही आपले विचार व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे   मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी केले. आभार प्रदर्शन या विभागाचे क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुमेर सानेकर,  विजय नागे,  अभिजीत दुधाटे, पुष्पलता अफुने, अमित घुले, प्रदीप सावळकर, प्रदिप पान्हेरकर, रविचंद्र पडघान, समाधान खरात, आदींनी परिश्रम घेतले.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा