मंगरुळपीर-सर्वधर्मीयामध्ये सलोखा ठेवन्यासाठी मंगरुळपीर पोलिस स्टेशनच्या वतीने ऊपविभागिय पोलिस अधिकारी सुधाकर यादव आणी ठाणेदार रमेश जायभाये यांच्या प्रमूख ऊपस्थीतीत पार पडली.
सध्या भिमा कोरेगाव प्रकरणामुळे सर्वईकडे वातावरण दुषीत झाल्याने काही कलुषीत विचार पसरवून जातीय तेढ निर्माण करन्याच्या दृष्टीने काही समाजकंटक व्देष पसरविन्याचा प्रयत्न करीत आहेत पण मंगरुळपीरमधे सर्व जातीधर्मामध्ये सलोखा असुन सर्व धर्मीयामध्ये एकोपा नांदत आहे असाच सर्वधर्मीयामधे सलोखा कायम राहावा या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करन्यात आले.कुणाही अफवावर विश्वास न ठेवता अनूचित काही प्रकार आढलल्यास तात्काळ पोलिसांना कळवा असे यावेळी ठाणेदार यांनी सांगीतले.यावेळी पञकार,सामाजिक कार्यकर्ते यासह न.प.पदाधिकार्यांची ऊपस्थीती होती.
सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा