बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने महामानवांना अभिवादन


सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा शहर शाखेच्या वतीने 6 डिसेंबर रोजी मानमानवांचा अभिवादन करण्यात आले. स्थानिक डॉ. अांबेडकर चौक येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन व हारार्पण करुन बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, अनुसुचित जाती मोर्चाचे चिटणीस नितेश मलीक, जिल्हा संघटन सरचिटणीस धनंजय रणखांब, भाजपा उपाध्यक्ष निलेश जैस्वाल, सुनिल तापडीया, कपिल सारडा, भाजयुमो शहर अध्यक्ष पवन जोगदंड, व्यापारी आघाडी अध्यक्ष जीवन अग्रवाल, ओबीसी मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत चिपडे, किसान आघाडी अध्यक्ष गजानन जाधव, न.प. सदस्य गौतम सोनुने, प्रशांत बोरकर, आशुतोष राऊत, गणेश खंडाळकर, कैलास मुंगनकर, शिवा गाडेकर, बाबु मिर्झा, भिकाजी ढगे, वैभव रोडे, अनंत जुमडे, यादव आदी भाजपा व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा