बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

भव्य अभिवादन मोटारसायकल रॅली संपन्न




महामानव विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य दरवर्षी प्रमाणे यंदाही 6 डिंसे. ला भव्य दिव्य अभिवादन मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन 6 डिंसे. वेळ 9 वाजता रॅलीला सुरूवात झाली. तत्पुर्वी बुद्ध वंदना व हारार्पनाचा कार्यक्रम  झाला त्यानंतर रॅलीच्या  सुरूवातीला युवा उद्योजक प्रकाश लिंगाटे यांनी निळी पंचशिल झेंडी दाखवून रॅलीचा प्रारंभ करून दिला पुढे रॅली "बुद्धम शरणम् गच्छामी" च्या गजरात निघत रॅलीच्या मार्गावरील सर्व बहूजन महापुरुषांना हारार्पन करून रॅली पुढील मार्गाने दरवर्षी प्रमाणे डाँ. आंबेडकर चौक, पासुन जयस्तंभ चौक, नेहरू चौक, नगिना मस्जीद समोरून, गाडगे महाराज पुतळा, महात्मा फुले चौक, रामासावजी चौक, जिजामाता चौक, दत्त चौक, पोहा वेस मधून सुभाषचंद्र बोस, बायपास, बस स्टॉप, तसेच अशोक नगर बुद्धविहाराच्या प्रांगणामधे रॅलीचा समारोप झाला.

तसेच अभिवादन रॅली मधे सर्व बांधव निळे पंचशिल ध्वज मोटारसायकला लावून व पांढरे शुभ्र वस्त्र धारन करून सर्व समाजातील बांधवांची बहूसंख्येने उपस्थित होते. रॅली अतिषय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील मुख्य चौकातुन मार्गक्रमन करत निघाली तसेच रॅलीसाठी सर्व समाजातील बांधवानी सहकार्य दिले. या अभिवादन मोटारसायकल रॅलीसाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन रॅली समितीचे अध्यक्ष सचिन खांडेकर, उपाध्यक्ष महादेव ठोंबरे, सचिव किशोर उके, कोषाध्यक्ष राजु जामनीक, सदस्य बंटी बोरकर, सदस्य सलोनी ठोंबरे. यांनी अथक परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विजय भड यांनी केले.

ता.प्रतिनिधी कारंजा - विनोद नंदागवळी,  9673954516

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा