बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

51 हजाराचा दिला धनादेश : संयम स्वर्णिम महोत्सव विशेषांकाचे विमोचन

ना. गडकरी यांनी घेतली सोमाणी यांच्या सामाजीक कार्याची दखल
51 हजाराचा दिला धनादेश : संयम स्वर्णिम महोत्सव विशेषांकाचे विमोचन
सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - गत वीस वर्षापासून सामाजीक क्षेत्रात भरीव कार्य करणारे तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या सामाजीक कार्याची दखल घेवून केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 51 हजार रुपयाचा धनादेश देवून त्यांना युवागौरव म्हणून सन्मानित केले. सोमाणी हे गत वीस वर्षापासून मेळघाट येथील आदिवासी भागात सामाजीक कार्य करीत असून त्यांना मदत करीत आहेत. सोबतच दीनदलीत, आदिवासी, निराधारांना सदैव वेगवेगळ्या सामाजीक कार्यातून त्यांनी मोठा आधार देवून अनेकांना त्यांच्या पायावर उभे केले आहे. आपादग्रस्त भागातही सोमाणी यांनी त्यांना मदत करुन त्यांचे संसार उभे केले आहे. शासनाच्या वतीने मिळालेल्या पुरस्काराची रक्कम जलसंधारण कार्याला देवून धनज बु. या गावात वॉटरकप स्पर्धेच्या अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला होता. सोबतच शासनाच्या वतीने देण्यात येणारी कर्जमाफी नाकारुन त्यांनी तो निधी मुख्यमंत्री यांच्या सहायता कोषमध्ये देण्याचा निर्णय घेवून गरजवंतांना त्या रकमेचा उपयोग व्हावा असा आशावाद व्यक्त केला आहे. रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, पशुपक्षांसाठी पाणपोई सोबतच आपल्या घरासमोर गत नऊ वर्षापासून गायीसाठी ढेपचार्‍याची व्यवस्था ते अविरतपणे करत आहेत. ना. गडकरी यांची सोमाणी यांनी नागपूर येथे जनसंपर्क कार्यालयात भेट घेवून चर्चा केली. ना. गडकरी यांनी सोमाणी यांना विशेष वेळ देवून त्यांच्या सामाजीक कार्याची पुर्ण माहिती घेतली. युवा वयात अत्यंत प्रभावी सामाजीक काम आपल्या हातून होत असून विदर्भातील सामाजीक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कार्य गडकरी करीत असल्याने त्यांनी तात्काळ सोमाणी यांना 51 हजार रुपये देवून सोमाणी यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला. सोमाणी यांच्या कार्याची दखल घेतल्याने वाशीम जिल्हयाचा गौरवही वाढला असून नागपूर येथे श्रीश्री रविशंकर यांची भेट घेवून सोमाणी यांनी आपली वडीलोपार्जित जमीन दान देवून त्या ठिकाणी अध्यात्म व संस्कार केंद्र उभारण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. सोमाणी यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय युवा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, पत्रकारीता पुरस्कार सोबत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
सोमाणी हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष असून 6 डिसेंबर रोजी न.प.च्या वतीनेही त्यांची स्वच्छता अभियानात स्वच्छता दुत म्हणून त्यांची नियुक्ती नगराध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी करुन त्यांच्या सामाजीक कार्याचा गौरव केला आहे. ना. गडकरी यांनी आपल्या कार्याची दखल घेवून जे प्रोत्साहन दिले त्यामुळे सामाजीक कार्य करणार्‍यांना मोठे बळ मिळणार आहे. गडकरींसारख्या नेतृत्वाची खरज गरज असल्याचे प्रतिपादनही सोमाणी यांनी यावेळी केले.
    ना. गडकरी यांना निलेश सोमाणी यांनी बहुचर्चित गीनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले तरुण सागरजी महाराज यांचे कडवे प्रवचन पुस्तक भेट दिले. सोबतच आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्यावरील संयम स्वर्णीम सुवर्ण महोत्सव या विशेषांकाचे विमोचनही ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, देशमुख उपस्थित होते.
बेटी बचाव बेटी पढाव अभियानाची केली प्रशंसा
    ना. गडकरी यांनी वाशीम जिल्हयात बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे संयोजक डॉ. दीपक ढोके व तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या वतीने मोठे अभियान राबविण्यात येत असून लग्न समारंभात वर वधुंना बेटी बचावचा आठवा फेरा व पर्यावरणाचा नववा फेरा देण्यात येत असून हा आगळावेगळा उपक्रम माहित होताच ना. गडकरी यांनी या अभियानाची प्रशंसा केली. निश्चितच यामुळे समाजामध्ये मुलामुलींमधील भेद कमी होवून महिलांना न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हे अभियान वाशिम जिल्हयात स्तुत्यपणे राबवित असल्याने त्यांनी या कार्याला शुभेच्छाही दिल्या.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा