महेंद्रकुमार महाजन
समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद वाशिम व श्री संत गजानन महाराज निवासी मूकबधिर विद्यालय मोरगव्हान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त विविध क्रिडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते,200 मीटर धावण्याच्या शर्यतीत महादेव वाघ,अक्षय सोसे, नितीन मोरे व कृष्णा डोंगरे यांनी सहभाग घेतला होता तर लांब उडी सुमित सानप,अभिषेक बहिरवल व अमोल गाभणे यांनी सहभाग घेतला होता, खो-खो स्पर्धेत मुक्ता जायभाई, शिवानी भोसले, पल्लवी मारकड, प्रेरणा ठोके,ज्ञानेश्वरी पायघन व पायल जाधव यांनी सहभाग घेतला होता,स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, गणेश झाडे,शिक्षक अनिल आवटे,दामोदर कोकाटे,तसेच सर्व कर्मचारी सहभागी झाले होते,क्रीडा स्पर्धा चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकाटे यांनी सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले,व सर्व मुलांना जागतिक अपंग दिनानिमित्य शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व खाऊ चे वाटप करण्यात आले
महेंद्रकुमार महाजन
9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा