सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

नारेगाव येथे बेकायदेशीर ब्लास्टिंग , जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष


कारंजा तालुक्यातील नारेगाव येथे गिट्टी खदान असून बेकायदेशीर ब्लास्टिंग होत आहे. या कडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कुणीही कितीही प्रामाणिकपणे ब्यवसाय करीत असल्याचा डांगोरा पिटत असला तरीही जे जे या व्यवसायात उतरले त्यांना भारतीय बॉम्बस्फोट कायद्याचा कलम ३ (१) चा भंग करून बेकायदेशीर रित्या स्फोट करूनच भूमातेच्या उदरातून निर्दयपणे पाषाण काढल्याशिवाय हा व्यवसाय केलाच जाऊ शकत नाही. असाच प्रकार कारंजा तालुक्यातील नारेगाव  गिट्टी खदानवर होत आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. या गिट्टी खदानीच्या  बाजूला असलेली शेतीवर  व शेतकऱ्याच्या आरोग्यावर मोठा जीवघेणा परिणाम होत आहे. कारण ह्या खदाणीतील स्फोटामुळे बारीक कण  हवेमध्ये पसरतात त्यामुळे शेतकऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. नारेगाव  या गावातील क्रेशर यंत्र व संबंधित गिट्टी खंडणीचा फेर फटका रात्रीच्या वेळी मारल्यास चित्र पूर्ण स्पष्ट होईल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा