रविवार, ३ डिसेंबर, २०१७

द रिअल हिरो युसूफ पुंजाणी एक राजकीय पावर भारिप बहुजन महासंघ जिल्ह्यात सक्षम



फुलचंद भगत 

वाशिम जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाची ताकद वाढली ती केवळ युसूफ पुंजाणी यांच्यामुळेच! हे सत्य कोणीच नाकारू शकणार नाही. युसूफ पुंजाणी यांनी भारीप बहुजन महासंघात प्रवेश केला  आणि चमत्कार घडण्यात सुरुवात झाली. युसुप पुंजाणी यांनी कारंजा विधानसभा निवडणूक लढवली   अल्पमताने त्यांचा पराभव झाला .  युसुफ पुंजाणी यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या तोंडाला फेस आणला  केवळ अपघातानेच राजेंद्र पाटणी निवडून आले.  युसूफ पुंजाणी यांनी भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेताच  त्यांनी पक्षाला बळकटी आणली  .वाशिम जिल्ह्यात नगरसेवक निवडून येणे दिवास्वप्न वाटत असताना 3 नगर परिषद वर भारीपचा झेंडा फडकविला .कारंजा नगर परिषद वर एकहाती सत्ता घेतली बौद्ध समाजाचा  नगराध्यक्ष मताधिक्याने निवडून आणला . मंगरुळपीर नगरपरिषद वर भारिप बहुजन महासंघाचा झेंडा फडकविला .
वाशिम जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाची ताकद वाढली . कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणत युसुफ पुंजाणी यांनी भारिप बहुजन महासंघाची  सत्ता  प्रस्थापित केली.  वाशिम  नगराध्यक्षा चा  अल्पमताने पराभव झाला . युसुफ पुंजाणी नावाचे वादळ राजकारणात घोंघावत असतानाच भल्या भल्याच्या तोंडचे पाणी पळाले .युसुफ पुंजानी या वाघाला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी  गुप्त खलबते झालित . वादळाला  शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले .विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीचा अंदाज घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या युसुफ पुंजानी यांची सुपारी दिल्यानेच पक्षात बंडाळीची भाषा केली जात असल्याची चर्चा रंगली आहे . हा पक्षातील अंतर्गत कलह  असल्याचे काहींचे मत आहे .वादाची ठिणगी कारंज्यातून पडली . कारंजा चे नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यांत आणि जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्यात धुसफूस झाली आणि उघडउघड विरोध सुरू झाला. युसूफ पुंजानी  यांनी  डीपीटीसी निवडणूक लढवून उमेदवार निवडून आणला  जिल्ह्याध्यक्षांनी जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून विरोध करणाऱ्याना चपराक दिली . त्यामुळे भारिप चा नाराज असणारा एक गट राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली
आज जिल्ह्यात भारीपची ताकद वाढविण्यात पुंजाणी यांचा सिंहाचा वाटा आहे  नगराध्यक्षा नंतर भारीपचे आमदार निवडून आले तर नवल वाटू नये द रिअल हिरो युसूफ पुंजानीच ठरणार आहे एवढे मात्र निश्चित! 

फुलचंद भगत मं. पीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा