रविवार, ३ डिसेंबर, २०१७

महापरिनिर्वाण दिनी अभिवादन उपस्थित राहण्याचे स्मारक समितिचे आवाहन


सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुधवार, 6 डिसेंबर रोजी 61 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 9 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता कॅन्डलचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. या अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिीमध्ये स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार भिमराव कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर जुमडे, सचिव तेजराव वानखेडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय इंगोले, अनंत तायडे, जग्गु राऊत, डॉ. रमेश वानखेडे, परमेश्वर अंभोरे, अरविंद उचित, जय वानखेडे, शेषराव मेश्राम आदींची उपस्थिती राहील. तरी या अभिवादन कार्यक्रमाला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्मारक समितीच्या वतीने सुखदेव खोडके, दिलीप कांबळे, दिपक भगत, राहुल सुर्वे, उल्हास इंगोले, पंकज अढागळे, राजेश खडसे, विद्यानंद वानखेडे, ज्ञानेश्वर अढागळे, बाबासाहेब बुक्तार यांच्यासह समाजबांधवांनी केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा