रविवार, १० डिसेंबर, २०१७

पालकमंत्री संजय राठोड यांनी केले मिसाळ कुटुंबियांचे सांत्वन



सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम : महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मानोरा तालुक्यातील सोयजना येथील आत्महत्या केलेल्या ज्ञानेश्वर नारायण मिसाळ या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तहसीलदार सुनील चव्हाण उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री ना. राठोड यांनी ज्ञानेश्वर मिसाळ यांचा मुलगा सागर याच्याशी चर्चा करून त्यांच्या कुटुंबाची शेती, कर्जविषयक माहिती जाणून घेतली. पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेतली असून ज्ञानेश्वर मिसाळ यांनी शासनाकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा व मिसाळ कुटुंबियांसोबत झालेली चर्चा याबाबतचा अहवाल तयार करून शासनाला पाठविण्यात येणार आहे. याविषयी शासन नक्कीच गांभीर्याने विचार करेल. अवैध सावकारी प्रकरणाची चौकशी करून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा