सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - राजकारणात अनेक लोकं येतात अनं जातात. पदे मिळतात अनं तेही जातात. मात्र जो व्यक्ती समाजासाठी दिनदुबळ्यांसाठी झटतो, कार्य करतो. त्याच्या कार्यामुळेच नावलौकीक मिळत असतो. सामाजीक कार्यकर्ते तथा भाजपाचे अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष वसंतराव धाडवे हे दिनदुबळ्यांना देव मानुन त्यांची सेवा अविरत करीत आहेत. शैक्षणिक क्षेत्राचे दालन त्यांनी विदर्भात व मराठवाड्यात उभे करुन अनेकांना रोजगार व पायावर उभे केले आहे. समाजसेवक हीच त्यांची खरी ओळख असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायकराव मेटे यांनी केले. स्थानिक आयुडीपी येथील धाडवे यांच्या निवासस्थानात दि. 10 डिसेंबर रोजी धाडवे मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत सत्कार सोहळ्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष अशोक हेडा, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीपदादा पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत भुतेकर, कंत्राटदार संघटनेचे कॅप्टन प्रशांत सुर्वे, विभागीय अध्यक्ष शिवा मोहोड, प्रवक्ता देव इंगोले, गजानन भिसडे, सौ. धाडवे आणि डॉक्टर प्रविण धाडवे आदींची उपस्थिती होती. यावेळी धाडवे मित्रमंडळाच्या वतीने आमदार मेटे यांचा वसंतराव धाडवे यांच्या हस्ते श्री बालाजीची प्रतिमा, शाल, श्रीफळ देवून भावपुर्ण सत्कार करण्यात आला. सोबतच न.प.च्या वतीने स्वच्छता अभियानाचे विशेष दुत, पत्रकारीता पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार मेटे यांच्या हस्ते सामाजीक कार्यकर्ते तथा तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मेटे यांनी वाशीम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले जीवनाचे ध्येय आहे. विदर्भात अमरावती विभागाचा बॅकलॉग वाढत आहे. वाशीम जिल्हा अद्यापही दुर्लक्षीत असून समाजासोबत जिल्हयाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी धाडवे परिवाराचे विशेष अभिनंदन करुन त्यांचे कौतूक केले. प्रास्ताविकातून वसंतराव धाडवे यांनी सामाजीक कार्याची माहिती देत आगामी मंत्रीमंडळात ना. मेटे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी श्री गजानन चरणी प्रार्थना केली. कार्यक्रमाचे संचालन निलेश सोमाणी तथा आभार डॉ. प्रविण धाडवे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला धाडवे मित्रमंडळासमवेत वाशीम व मंगरुळपीर मतदार संघातील ग्रामीण भागातून ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा