सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - नोटाबंदी, शेतकर्यांच्या मालाला भाव, शिष्यवृत्ती, महागाई आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या मंगळवार, 12 डिसेंंबर रोजी नागपूर येथे विधान भवनावरील हिवाळी अधिवेशनावर आयोजीत करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये पिपल्स रिपब्लीकन पार्टीचा सहभाग असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे या मोर्चात उपस्थित राहणार आहेत. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. तरी वाशीम जिल्हयातील पीआरपीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, जिल्हा महामंत्री सरकार इंगोले, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कांबळे, दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष रवि भगत, पिरीपाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन केशवाणी, महिला जिल्हाध्यक्ष वंदना राऊत, शहराध्यक्ष नितीन कांबळे, पिरीपा राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रपाल हिवराळे, महादेव कांबळे, पांडुरंग अंभोरे, शाम खिल्लारे, अमोल गवई, गना कांबळे, पंडीतराव खडसे, सदा पाटीलआदींनी केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा