रविवार, १० डिसेंबर, २०१७

रिपाइं (ए) च्या वतीने नागपूर येथे विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन


उपस्थित राहण्याचे तेजराव वानखडे यांचे आवाहन
सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने येत्या सोमवार, 18 डिसेंबरला दुपारी 12 वाजता नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले माहिती जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी दिली. 
    या विदर्भ राज्य परिषदेबाबत माहिती देतांना वानखडे म्हणाले की, विकासाचा असमतोल दुर करायचा असेल तर लहान राज्याचा निर्मितीचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्राच्या स्थापनेला 57 वर्ष होत आहे. तरी विदर्भाचा विकास झाला नाही. विकासापासून विदर्भ अजुनही उपेक्षीत आहे. विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. विदर्भात कापुस, संत्रे व सोयाबीन ही उत्पादन देणारी पिके आहेत. तसेच ज्वारी, बाजरी, तांदुळाची लागवड विदर्भात जास्त प्रमाणात होते. विदर्भ हा वनस्पतीने व खनिजसंपत्तीने संपन्न प्रदेश आहे. विदर्भात कोळसा, विज उत्पादनाचे 4 प्रकल्प विदर्भात आहेत. महाराष्ट्रातील सर्व व्याघ्रप्रकल्प विदर्भातच आहेत. त्याचप्रमाणे पैनगंगा, वैनगंगा यासारख्या बारमाही वाहणार्‍या नद्या आहेत. नागपूर शहराचा विचार केला तर विधानभवन, रिझर्व्ह बँक, आकाशवाणी ही विदर्भाची जमेची बाजु आहे. म्हणून वेगळा विदर्भ होणे अत्यंत गरजेचे आहे. विदर्भ राज्य झालेच पाहीजे या मागणीकरीता ना. रामदास आठवले यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला असून विदर्भ राज्य व्हावे यासाठी या विदर्भ राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी दिली.
    18 डिसेंबरला होणार्‍या या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री तथा लोकनेते ना. रामदास आठवले हे करतील. तर  अध्यक्षस्थानी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर यांची उपस्थिती राहील. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी महाअधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, विदर्भ राज्य विकास महासंघाचे माजी खासदार दत्ताजी मेघे, आमदार रवि राणा यांची उपस्थिती लाभेल.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल गोंडाणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर तायडे, पुर्व विदर्भ अध्यक्ष आर.एस. वानखेडे यांची उपस्थिती राहील. तरी 18 डिसेंबरला नागपूर येथे होणार्‍या या विदर्भ राज्य परिषदेला वाशीम जिल्हयातील रिपाइंच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तेजराव वानखडे यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मोहनसिंग राठोड, अनिल इंगळे, जिल्हा युवा अध्यक्ष जय वानखडे, रोजगार आघाडी अध्यक्ष सुखदेव खोडके, बौध्द महासभा संयोजक अरविंद उचित, डॉ. रमेश वानखडे, जिल्हा सचिव दिलीप कांबळे, मालेगाव तालुकाध्यक्ष प्रकाश गवई, रिसोड तालुकाध्यक्ष हिरामन साबळे, कारंजा तालुकाध्यक्ष परशराम वासनिक, बाबाराव राठोड, मिलींद सोनुने, मानोरा, मिलींद इंगोले मंगरुळपीर, रामजी भगत, रमेश काजळे, जिल्हा सचिव रवि भगत चिखली, कैलास मैदकर, सुखदेव मैदकर, संजय गायकवाड, संजय भिसे कारंजा, विलास सिरसाट कारंजा, मंगेश सिरसाट कारंजा, विनोद इंगोले, राजेश खडसे, सुखदेव खोडके, विद्यानंद वानखडे, ज्ञानेश्वर अढागळे, पंढरी कंकाळ, गोविंदराव इंगोले, शाहीर विश्वनाथ इंगोले, लोडजी भगत, सुरेश पडघान, सिध्दार्थ पट्टेबहादूर, सचिन भगत,  सुखदेव सरकटे, संजय कांबळे, माणिकराव जामनीक मानोरा, पंकज अढागळे, रामराव भगत, दयाराम खाडे, देवचंद खाडे आदींनी केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा