सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

केळीत कन्या जन्माचे सुकन्याने स्वागत शिक्षकांचा अभिनव उपक्रम


सम्राट टाइम्स न्यूज
मुलींचे जन्मदर घटत चालल्याने मानव जातीचे संतुलन धोक्यात  आले आहे .मुलींचे घटते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाने कठोर कायदे केले आहे तसेच योजनाही जाहीर केल्या आहेत  तरीही छुप्या मार्गाने लिंग चाचणी होत असल्याचे प्रकार घडत आहेत . मुलींना नकोसे समजणाऱ्या मानसिकतेला बदलण्याची गरज निर्माण झाली आहे . मालेगाव तालुक्यातील  दुधाळा जिल्हा परिषद शाळेतून बदली होऊन प्रशांत देशमुख नावाचे शिक्षक केळी जिल्हा परिषद शाळेवर रुजू झाले  शाळेत मुलांची पटसंख्या मुलीपेक्षा  सर्वाधिक असल्याचे लक्षात आले  .   शिक्षक प्रशांत देशमुख यांनी गावात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी सहकारी शिक्षक शरद पाटील यांच्याशी चर्चा केली  दोघानी  जातीपातीच्या भिंती तोडत गावात  जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे सुकन्या योजने अंतर्गत 5000 रुपये  बँक खात्यात जमा करण्याचे  ठरविले 15 ऑगस्ट 2017 रोजी स्वातंत्र्यदिनी गावकऱ्यां समोर सुकन्या योजनेची घोषणा केली .गावकऱ्यानी शिक्षकाच्या हाकेला ओ देत काही रक्कम वर्गणी करून शिक्षाकाकडे  जमा केली  गावात जन्मलेल्या 5  मुलींच्या नावे प्रत्येकी 5000 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आतापर्यंत 25 हजार रुपये मुलींच्या नावे जमा करण्यात आले आहे याच रकमेतून मुलींचे पुढील शिक्षण ,   लग्नासाठी मोठा आधार मिळणार आहे मुली आई वडीलाना ओझे वाटणार नाही आणि मुलींचा जन्मदर वाढण्याची  आशा मुख्याध्यापक प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केली 
केळी गावाचा  आदर्श इतर गावानी घ्यावा असे आवाहन शिक्षक शरद पाटील यांनी केले आहे 
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा