नागपुर औरंगाबाद महामार्गावर 33 के.व्ही उपकेंद्र किन्हीराजा समोर आज दुपारी 4:30 च्या दरम्यात गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात बुलेरो गाडीला मागुन येत असलेल्या कंटेनर क्रमांक NL 01 K 2228 ने क्रमांक नसलेल्या बुलेरो गाडी ला जबर धडक दिली त्यामध्ये बुलेरो मधील दोन जण जख्मी झाले असुन त्या मध्ये एका महीलेचा समावेश असुन लग्नावरून परत येत असल्याची माहीती मिळाली आहे गायीला सुध्दा मोठ्याप्रमाणात मार लागला असुन न्यु बुलेरोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटना स्थळी किन्हीराजा पोलीस चौकीचे कर्मचारी हजर होते.
सम्राट टाईम्स


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा