कारंजा तालुक्यातील कामरगाव ह्या गावामध्ये जिल्हा परिषदेने तीन खोल्याचे बांधकाम हे २००५ साली केले होते. प्रथमतः हि ३ गाळे व कंपाउंड जिल्हा परिषदेच्या ताब्यात होती. परंतु आज ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे असा कांगावा ग्राम पंचायत करीत आहे. आमच्या पत्रकाराने ग्रामपंचायतकडे माहिती मागितली होती तेव्हा ग्रामपंचायतीने साधी लेखी माहिती दिली त्यामध्ये असे नमूद केले कि, जिल्हा परिषदेने २१/०४/२००५ रोजी हि गाळे व कंपाउंड जिल्हा परिषद शाळेला हस्तांतरित केले आहे. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद शाळेला माहिती मागितली असता त्यांनी आम्हाला माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती दिली कि २१/०४/२००५ मधेच आम्ही ग्रामपंचायतला हस्तांतरित केली आहे. नंतर आम्ही पाणी पुरवठा अभियंता जि. प. कारंजा लाड येथे माहिती मागवली असता तेथे त्यांनी लेखी सांगितले कि, जि. प. सर्वसाधारण सभा १०/०८/२०१२ मध्ये झालेल्या चर्चेनुसार व केलेल्या कामांपैकी मुख्यत्वे गाळे व कंपाउंड या मालमत्तेचे अख्त्यार ग्रामपंचायत असल्यामुळे सदर मालमत्ता ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली आहे. व दोन्ही हस्तांतरण टिप्पण्या सोबत जोडल्या होत्या. यांनी दिलेल्या माहितीनुसार फरक आढळून आला आहे. याचा निष्कर्ष काढल्यास ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारची ठोस माहिती नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पत्रातून सगळा सावळा गोंधळ झालेला दिसून येत आहे. पण आता ते ३ गाळे २००५ पासून आतापर्यंत खालीच होते परंतु आता ती ३ गाळे ग्रामपंचायतच्या अख्त्यार असल्यामुळे ते तीन गाळे हर्रास करण्याच्या मार्गावर कामरगाव ग्रामपंचायत आहे. असे गावामध्ये चर्चेचे उधाण आले आहे.
विनोद नंदागवळी
मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा