गोपर्यटक चे आयोजन, आकर्षक बक्षिसे
वाशीम : स्थानिक पारस प्लाझा येथील गोपर्यटकच्यावतीने हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन भाषेत अ व ब या दोन गटात जिल्हास्तरीय पर्यटन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आकर्षक बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार असून सदर स्पर्धा निशुल्क असून 25 डिसेंबरपर्यंत स्पर्धकांनी निबंध गट अ मध्ये इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांनी कमीत कमी 350 शब्द व गट ब इयत्ता 9 ते 12 वर्गातील विद्यार्थ्यांनी कमीत कमी 500 शब्द मर्यादेत माझ्या आयुष्यातील एक अविष्मरणीय सहल, एक प्रेक्षणीय ठिकाण जेथे मला जायला आवडेल का? मानवी आयुष्यात प्रसावाचे महत्व वाशीम जिल्हयातील पर्यटन स्थळ, जिवनाचा खरा आनंद प्रवासातच आहे, सहल व्यवस्थापन व मार्गदर्शकाची आवश्यकता या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गोपर्यटक चे संयोजक निखील नांदगावकर, समाजसेवी अविनाश मारशेटवार व वत्सगुल्म रेडिओ व मारवाडी युवा मंचेच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत विजेत्यांना गट अ मध्ये पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषीक रोख 2001 व नागपूर ते मुंबई विमान प्रवास व पर्यटनावर आधारित पुस्तक, व्दितीय पारितोषीक रोख 1501 व नागपूर ते मुंबई विमान प्रवास व पर्यटनावर आधारित पुस्तक, तृतिय रोख 1001 व नागपूर ते मुंबई विमान प्रवास व पर्यटनावर आधारित पुस्तक, गट ब मध्ये 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांनाप्रथम पारितोषीक रोख 2501 व नागपूर ते मुंबई विमान प्रवास व पर्यटनावर आधारित पुस्तक, व्दितीय पारितोषीक रोख 1501 व नागपूर ते मुंबई विमान प्रवास व पर्यटनावर आधारित पुस्तक, तृतिय रोख 1001 व नागपूर ते मुंबई विमान प्रवास व पर्यटनावर आधारित पुस्तक आदि बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेला निबंध स्वत: कुरियर किंवा स्वताच्या शाळेतील मुख्याध्यापकाकडे जमा करावे सोबतच निबंध पत्रिकेच्या पहिल्या पानावर संपूर्ण नाव, वय, निबंधाचा विषय, पूर्ण पत्ता व फोन नंबर टाकून केवळ वाशीम जिल्हयातील स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येणार असल्याचे माहितीही गोपर्यटकचे संचालक निखील नांदगावकर यांनी केले आहे.
Samrat time's

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा