.
मंगरुळपीर शहरातील घटना
मंगरुळपीर-मंगरुळपीर शहरातील तलाठी कार्यालयात दि.८ रोजी दुपारी २ वाजता एका व्यक्तीने तलाठ्यास मारहाण प्रकरणी आरोपिविरुध्द पोलिसांनि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहीतीनूसार फिर्यादी पांडुरंग रामभाऊ जटाळे यांनी फिर्यादीत नमूद केले की,मी तलाठी कार्यालयात सातबारा रेकार्ड तपासणी करतांना आरोपी गणेश विठ्ठल भेंडेकर याने ऊत्पन्नाचा दाखला मागीतला,त्याला दाखला आणन्यास सांगीतले असता त्याने मारहाण करुन जिवे मारन्याची धमकी दिली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपिविरुध्द कलम ३५३;३२३,५०४,५०६ भांदवी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा