शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा संघटक रवि अंभोरे कडून आवाहन
शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांची सभा रविवारी दि १०डिसेंबर ला सकाळी ११वाजता स्थानिक श्री बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड येथे आयोजित केली आहे. सभेमध्ये शिक्षकांच्या संबंधित विविध विषयावर व समस्यांवर आमदार देशपांडे विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत.
२० टक्के अनुदान मिळाले परंतु पुढील टप्प्याविषयी शासनाची भूमिका,१व२ जुलै घोषित शाळांचे अनुदान,अघोषित शाळांना घोषित करण्यासाठी विलंब का?,उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मिळण्यातील शासनाची उदासीनता, सातवा वेतन आयोग संबंधी शासन स्तरावरील हालचाली,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इत्यादी सह शिक्षकांशी संबंधीत विषयावर चर्चा होणार आहे.हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्याच्या दृष्टीने या सभेला विशेष महत्व असणार आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील शिक्षक आघाडीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व प्राचार्य,मुख्याध्यापक व शिक्षकांनी सभेला नियोजित वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संघटक रवि अंभोरे सह रिसोड तालुका शिक्षक आघाडी च्या वतीने करण्यात आले आहे.
महेंद्रकुमार महाजन जैन
रिसोड प्रतिनिधी
9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा