सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम - शहरात प्रथमच लॉयनेस क्लब या सेवाभावी संस्थेच्या वतीने मिस महाराष्ट्र या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या पुणे येथील माधुरी बांगडे यांच्या उपस्थितीत 14 वर्षाखालील मुले व मुली आणि 15 वर्षावरील युवती व महिलांसाठी भव्य स्वरुपात सौदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा रविवार, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्थानिक पुसद नाका येथील स्वागत लॉनमध्ये संपन्न होणार आहे. या सौदर्य स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी रविवार, 10 डिसेंंबर रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यत वाशीम अकोला हायवेवरील सुधास्मृती चव्हाण हॉस्पीटलमध्ये निवड चाचणी पार पडणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने विजयी स्पर्धकांसाठी विविध पुरस्कारही लॉयनेस क्लबच्या वतीने जाहीर करण्यात आली आहेत.
या स्पर्धेमध्ये मिस वाशीम क्वीन, मिस परफेक्ट गर्ल, मिस ब्युटी 2017, मिस परफेक्ट, बेस्ट वॉक, बेस्ट क्युट किड, बेस्ट स्टायलिस्ट किडस, बेस्ट कॉस्चुम किडस आदी पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. महिला, मुले व मुलींसाठी ही स्पर्धा खुली असून यामध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली आणि 15 वर्षावरील युवती व महिला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करु शकतील. स्पर्धेची प्रवेश फी केवळ शंभर रुपये ठेवण्यात आली आहे. मिस महाराष्ट्र ऑयकॉन, फेस ऑफ ईयर आदी पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या पुणे येथील मिस माधुरी बांगडे या स्पर्धेचे परिक्षक म्हणून उपस्थित राहतील. स्पर्धेमध्ये प्रामुख्याने वेशभुषा, सादरीकरण आणि मुलाखत या बाबीवर स्पर्धकांना गुण दिले जातील. स्पर्धेत भाग घेणार्या स्पर्धकांना उमेश डान्स इंन्स्टीट्युट वाशीम ही नृत्य संस्था मार्गदर्शन करणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने शनिवार 16 डिसेंंबरला माधुरी बांगडे यांच्या उपस्थितीत मॉडेलींग ट्रेनिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वाशीममध्ये प्रथमच भव्य स्वरुपात होणार्या या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ. सौ. निलिमा चव्हाण, सचिव अमरजित कौर कपुर, कोषाध्यक्षा संतोष अग्रवाल, हर्षा चरखा, सोनिया जिवनाणी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लॉयनेस क्लब वाशीमच्या वतीने करण्यात आले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा