बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

पांगरी येथील मागासवर्गीय स्मशानभूमीतील अतिक्रमण हटाव प्रकरणी आमरण उपोषण सुरू



वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पांगरी नवघरे येथील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमित गावातील 2 व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने ते हटविण्यासाठी आणि मोजणीला  हेतुपुरस्कर गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यासाठी 6 महिलांसह  13 ग्रामस्थानी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे . आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.काही वृद्ध महिला गंभीर झाल्या असताना कोणताही अधिकारी उपोषण  मंडपाकडे फिरकला नसल्याने प्रशासना विरोधात   रोष व्यक्त केल्या जात आहे . पांगरी नवघरे येथील गट नंबर 306 मधील  मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीत गावातील  2 सर्वनानी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे . याबाबत मागासवर्गीयांनी अतिक्रमण हटविण्यासाठी गटविकास अधिकारी, तहसीलदार,मुख्यकार्यकारी अधिकारी , जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदन दिले . 10 डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदनातून आमरण उपोषणाचा इशारा  देण्यात आला . गटविकास अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीच्या  जागेची मोजणी करून अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले .8 डिसेंबरला भूमी अभिलेख मालेगाव कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी जागेची मोजणी करण्याकरिता आले असता ग्रामसेवक मोजणीला हेतुपुरस्कर  गैरहजर राहिल्याने जागेची मोजणी होऊ शकली नाही. ग्रामसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडविण्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निवेदन वरिष्ठ  अधिकाऱ्यांना देण्यात आले. वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखविल्याने 6 मागासवर्गीय वृद्ध महिलांसह 13 ग्रामस्थानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि 25 डिसेंबर पासून  आमरण उपोषण  सुरू केले आहे . आज उपोषणाचा तिसरा दिवस असताना कोणताही अधिकारी उपोषण मंडपाकडे फिरकला नाही . उपोषणकर्त्या 2 वृद्ध महिलाची तब्बेत खालावली असताना अद्यापही त्यांना वैद्यकीय  उपचार पुरविण्यात आले नाहीत. प्रशासन मागासवर्गीय विरोधी असल्याने आम्हाला न्याय मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया उपोषणकर्ते रामदास वानखडे यांनी व्यक्त केली 
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा