बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

अन्यथा महावितरण कार्यालयाचे कुलूप फोडू :- अर्जुन सुर्वे



शेलुबाजार येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी मर्यादित केंद्र शेलुबाजार येथे पूर्णवेळ कनिष्ठ अभियंता नसल्यामूळे महावितरनचा गलथान कारभाराचा त्रास शेलूबाजार परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.शेलुबाजार येथे प्रभारी अभियंता दिलेला आहे परंतू त्यांना मंगरूळपीर व शेलुबाजार हे दोनही कार्यालय सांभाळावे लागत असल्यामूळे शेलूबाजारला विद्युत वितरण कार्यालयाला ते पूर्णवेळ देऊ शकत नाही.म्हणून स्वतंत्र कनिष्ठ अभियंता नसल्याने कार्यालय कामकाजाच्या वेळेत बंदच राहते.नागरिकांना खेड्यापाड्यातून यावे लागते पण आल्यानंतर कार्यालय मात्र बंद राहते वारंवार चकरा माराव्या लागत असल्यामूळे लोकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. कार्यालय उघडे नसल्याने नाकरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.नागरिक हे तुमचे ग्राहक असल्याने नागरिकांना सेवा पुरवणे हे महावितरणचे कर्तव्य आहे.आम्ही आपणास विनंती करतो शेलुबाजार येथे कनिष्ठ अभियंता लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा व कार्यालयाचे काम सुरळीत सुरू करावे.येत्या पंधरा दिवसात कामकाज वेळेत करण्यात यावे हि विनंती.कामकाजाच्या वेळेत कार्यालय बंद आढळल्यास कार्यालयाचे कुलूप फोडण्यात येईल.नागरिकांच्या या रोषाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी वाशिम जबाबदारा राहील.याची नोंद महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी वाशिम यांनी घ्यावी.असेही अधिक्षक अभियंता वाशिम यांना दिलेल्या निवेदनात अर्जुन सुर्वे यांनी म्हटले आहे.

सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा