सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम : कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कार्यालयांतर्गत गट-क संवर्गातील माजी सैनिक कोट्यात कृषि सेवक या पदाची खुला व एन.टी. सी. प्रवर्गातील प्रत्येकी एक जागा भरावयाची आहे. सदर पदाकरिता शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठातील पदविका किंवा समतुल्य म्हणून मान्यता प्राप्त शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या खुला व एन.टी.सी. प्रवर्गातील माजी सैनिकांनी दि. २ डिसेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण कागदपत्रासह वाशिम जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा