शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा दौरा


सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे शनिवार, दि. २ डिसेंबर २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दि. २ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ते यवतमाळ येथून वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे वाशिम विश्रामगृह येथे आगमन होईल. सायंकाळी ७ वाजता वाशिम येथील खासगी समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता ते यवतमाळकडे प्रयाण करतील.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा