वृध्द कलावंतांच्या बँक खात्याची अद्ययावत
माहिती सादर करण्याचे आवाहन
सम्राट टाइम्स न्यूज
वाशिम : राज्यातील मान्यवर साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत मंजूर कलावंतांना सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या मानधनाची रक्कम सप्टेंबर २०१६ पासून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्याकरिता मंजूर कलावंतांच्या बँक खात्याची अद्ययावत माहिती सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करणे आवश्यक आहे. तरी अद्याप हि माहिती सादर न केलेल्या कलावंतांनी आपली माहिती तातडीने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात सादर करावी, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
कलावंतानी बँक खाते पुस्तकाची स्पष्ट झेरॉक्स प्रत, ज्यामध्ये खाते क्रमांक, आयएफएससी कोड अद्ययावत व सुस्पष्ट असावा, हयातीचा दाखला, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व संपर्क क्रमांक याची माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा