मंगरुळपीर
श्री संताजी महाराज यांच्या जयंती
निमित्त दि.८डिसेंबर रोजी संध्याकाळी
७वाजता येथील लक्ष्मीविहार काॅलनी मधील श्री गजानन पंवटेश्वर हनुमान मंदीराचे सभागृहात श्री संताजी तेली समाज विकास मंडळाची सहविचार सभा
नत्थु रायके यांच्या अध्यक्षतेत संपन्न
झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक महाराष्ट्र
प्रांतीक तैलीक महासभा वाशीम
जिल्हाध्यक्ष शीवदास सुर्यपाटील यांनी
केले प्रथमत:श्री संताजी महाराज यांच्या
प्रतीमेचे सभाध्यक्ष रायके यांचेसह
उपस्थित समाज बांधवांनी पुजन केल्या
नंतर सभेला सुरुवात झालि.
याप्रसंगी तेली समाजाचे कार्यकरण्या
साठी मंडळाची कार्यकारिणी तयार करणे,
जेष्ट नागरिकांची समिती तयार करणे,
मार्गदर्शक समीती तयार करणे,युवक
कार्यकारिणी तयार करणे,महिला कार्यकारीणी तयार करणे,उपवधुवर परिचय समीती व उपवधुवर परिचय मेळावा आयोजना बाबत सामूहीक
चर्चा करुन विविध समित्यावर अध्यक्ष
उपाध्यक्ष, सचिव,कोषाध्यक्ष व सहाय्यक पदाची कार्यकारीणी संघटीत
करण्यात आली.
सर्वसमित्यावर कार्य करण्यासाठी
समाज कार्याची आवड असणार्या
समाज बांधवांची निवड सर्वानुमते करुन
महीला व युवक अशी वेगवेगळी कार्यकारणी करण्याबाबत चर्चा करण्यात
आली त्या वेळी युवा अध्यक्ष म्हणुन
सुनिल धोत्रे यांची सर्वानुमते निवड
करण्यात आली.
या कार्यक्रमाला देवराव वाढणकर,
प्रकाश रायके,ज्ञानेश्वर दिवाने,प्रमोद
सुडके,महादेव गर्दे,विजय भोजने,
विश्वनाथ गर्दे,ओमप्रकाश गोरे,प्रभाकर दळवी,संतोष राउत,शरद सुरसे,
डाॅ.सुधाकर क्षीरसागर आदी सह समाज
बांधवांची उतस्थिती उलेखणीय होती. सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा