सम्राट टाइम्स न्यूज
वाशीम ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गावातून समता रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. सकाळी 5 वाजता मागासवर्गीय शासकीय वस्तीगृहाजवळून निघून डॉ. आंबेडकर चौकामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी अभाविपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन त्यांना अभिवादन केले.
रॅलीमध्ये अभाविपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वसतीगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता वसतीगृहात डॉ. आंबेडकर अणि सामाजीक समरसता या विषयावर झालेल्या कायर्र्क्रमात प्रा. दिलीप जोशी यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जोशी यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या त्रिसुत्री नियमांची आठवण देवून प्रज्ञा, शिल, करुणा आपल्या जीवनात आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभाविपचे कार्यकर्ते अजय बोरकर, जगदीश इंगोले, यशवंत काळे, चिन्मय लक्रस, अंकुश भोपळे, श्रीवेद केळकर, दिनेश चव्हाण, भारत गायकवाड, धीरज धांडे, ऋषीकेश पंडीत, सागर कोल्हे, अजय भोपळे, शिवम कदम, रुपेश हेंद्रे, शुभम फुटाणे, मनोज अनसिंगकर, ओंकार गाडगे आदींची उपस्थिती होती.
सम्राट टाइम्स न्यूज


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा