शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

शेगाव येथे शेतकरी संघटनेचा स्वातंत्र्य मेळावा


पूर्णा प्रतिनिधी -{राजेश वालकर}राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शेगाव जिल्हा बुलढाणा येथे 12 डिसेंम्बर रोजी शेतकरी स्वातंत्र्य मेळावा आयोजित केला आहे, याबाबत अधिक माहिती अशी की,राज्यातील व केंद्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कडधान्य ,तेल,साखर, आयात करून शेती मालाचे भाव कमी केले आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी अडचणीत आले आहे, या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ व सम्पूर्ण शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती देण्यात यावी वीज बिल माफ करण्यात यावे सह अनेक मागण्या या स्वातंत्र्य मेळाव्यात मांडल्या जाणार असून या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल घनवट हे मार्ग दर्शन करणार असून परभणी जिल्ह्यासह पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आव्हान शेतकरी संघटनेचे पूर्णा तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, नामदेव लोखंडे, सह आदींनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा